ETV Bharat / city

नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत कॉपी करणाऱ्या बहाद्दरांना बसणार खीळ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

परीक्षा नियंत्रण विभागाने दावा केला आहे, की या पद्धतींना रोखण्यासाठी आम्ही व्यवस्था केली आहे. त्याला एक्झाम प्रॉक्टरिंग असे म्हणतात. यामुळे यात 'डु आणि डोन्ट' मुलांना परीक्षा देतांना पालन करून ही परीक्षा द्यायचे असत. यासाठी आम्ही 5 वेळा वार्निंग देऊ सहाव्या वेळा मात्र परीक्षा आपोआप बंद करण्याची व्यवस्था असल्याचा दावा केला जात आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Jun 24, 2021, 3:19 PM IST

Updated : Jun 24, 2021, 8:38 PM IST

नागपूर - डिजिटल माध्यमाचा उपयोग ऑनलाइन अभ्यासक्रमात वाढत आहे. परंतु याच ठिकाणी जिथे अभ्यास कसा करावा हे शिकवले जाते, तिथेच नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत कॉपी कशी करायची हे शिकवण्याचा उद्योग युट्यूबवरून एका महाभागाने केला आहे. यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गंभीरतेने दखल घेतली आहे. या व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागण्याचा धोका असल्याचेही सांगितले आहे. कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष शिकवण्यावर निर्बंध आले आणि ऑनलाइन शिकवण्याचा मार्ग पुढे आला. यात आता शिक्षण घेता घेता वर्ष लोटले असतांना परीक्षा घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्याचे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ठरवले आहे. यात एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने घरात बसून परीक्षा देताना कॉपी करता येऊ नये आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासर्व बाबींचा अवलंब करून ही साइट बनवण्यात आली. यात अटीशर्ती विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन परीक्षेत कॉपी करणाऱ्या बहाद्दरांना बसणार खीळ

'बिना टेन्शन के खुलके चिटिंग करे'

यूट्यूबर महाभागाने 'द एलपी व्हिलेजर' म्हणून चॅनल बनवले असून यावर व्हिडिओ टाकले आहे. यात 'गाइस कोई फरक नही पडेगा' म्हणत परीक्षा सुरू असतांना दुसरे टॅब ओपन करून परीक्षेचे उत्तर शोधता येऊ शकते, एक्झाम स्क्रीन समोरून हटले तरी काही फरक पडणार नाही. कॅमेरा बंद झाला तरी फरक पडणार नाही, अशी बतावणी करण्यात आली आहे. यात 'बिना टेन्शन खुलके चिटिंग कर सकते है, गाईस' अस सांगण्याचा प्रताप महाभागाने विद्यार्थ्यांना केले आहे.

विद्यापीठाच्या साइटवर अशा पद्धतीने रोखल्या जाते प्रकार

परीक्षा नियंत्रण विभागाने दावा केला आहे, की या पद्धतींना रोखण्यासाठी आम्ही व्यवस्था केली आहे. त्याला एक्झाम प्रॉक्टरिंग असे म्हणतात. यामुळे यात 'डु आणि डोन्ट' मुलांना परीक्षा देतांना पालन करून ही परीक्षा द्यायचे असत. यासाठी आम्ही 5 वेळा वार्निंग देऊ सहाव्या वेळा मात्र परीक्षा आपोआप बंद करण्याची व्यवस्था असल्याचा दावा केला जात आहे. यात परीक्षा देतांना वेब कॅम सुरू असणे, गुगल लोकेशन, ऑडिओ हे सुरू केल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशी व्यवस्था आहे. यासोबतच स्क्रीनवरून हटल्यावर, कुठला आवाज आल्यास किंवा अन्य काही प्रकार केल्यास पाच वेळा वार्निंग देतो आणि सहाव्यांदा मात्र पेपर लॉककरून देतो, अशी व्यवस्था असल्याचा दावा परीक्षा नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल साबळे यांनी केला आहे.

'एक्झाम प्रॉक्टरिंग' म्हणजे नेमके काय?

एखाद्या व्यक्तीच्या कौशल्याचे मूल्यमापन करतांना परीक्षा देणाऱ्याचे निरीक्षण करण्याचे काम शिक्षका ऐवजी संगणकाद्वारे केले जाण्याची पद्धत आहे. यात मोबाइलमध्ये फेस लॉक पद्धतीचा अवलंब केल्या जाते. त्याच पध्दतीने विद्यार्थ्यांची ओळख तपासून सत्यप्रात केली जाते. यात व्हिजवल इमेज रिकोग्नाइज केल्या जाते. यात हिवाळी परीक्षा नूकत्याच पार पडल्या असून यात जवळपास 800 विद्यार्थी या प्रॉक्टरिंगचा भंग केल्यामुळे पेपर लॉक झाले आहे. तर याप्रकरणी नागपूर सायबर पोलीस अधिक तपास करत असल्याचे पोलीस निरीक्षक डॉ. अशोक बागुल यांनी सांगितले आहे.

... तर महागात पडेल

आता 29 जूनपासून उन्हाळी परीक्षेला सुरूवात होणार आहे. यामुळे यात जवळपास साडे तीन लाखाच्या घरात परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. या अनुषंगाने तयारी केली आहे. यामुळे हे व्हिडिओ व्हायरल होत असतांना अधिका-अधिक खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने पूर्ण तयारी विद्यापीठाने केली आहे. यामुळे या व्हिडिओला बळी पडल्यास महागात पडू शकते, असे सांगितले जात आहे.

हेही वाचा -'डेल्टा प्लस रुग्णाबाबत पालकमंत्री उदय सामंत माहिती लपवत आहेत'

Last Updated : Jun 24, 2021, 8:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.