नागपूर - महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि पूर्वीचे महाराष्ट्र केसरी रामदास तडस ( Ramdas Tadas Kustigir Parishad President Application ) यांनी आज ( शुक्रवारी ) अर्ज भरला आहे. गेली अनेक दशके महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी कामकाज बघितले होते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती.
महाराष्ट्रात सत्ता पालट होताच भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारण बरखास्त करण्यात आली होती. संपूर्ण कार्यकारणीचं बरखास्त करण्यामागे अराजकीय कारण असल्याचे सांगितले जात होते. मात्र, राजकीय दृष्टीकोण आता समोर आला आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे खासादर रामदास तडस मैदानात उतरले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी खासदार रामदास तडस यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे.
कुस्तीगीर परिषदेवर पवारांचे प्राबल्य : गेली अनेक दशके राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र, आता भाजपाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आपल्या कब्जात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत का अशी चर्चा रंगली आहे.
रामदास तडस यांची राजकीय कारकीर्द : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या विधानपरिषदेतून दोनदा तडस आमदार राहिले. देवळी नगरपरिषदेचे अध्यक्ष, 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. रामदास तडस हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एसटी महामंडळाचे संचालक पद भूषविले आहे. 2014 मध्ये भाजपाच्या तिकीटावर ते खासदार झाले.