ETV Bharat / city

BJYM Protest : भाजयुमोने जाळला राहुल गांधींचा पुतळा, वीर सावरकर व संघाचा अपमान केल्याचा आरोप - BJYM burnt statue of Rahul Gandhi

भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) (BJYM) नागपुरने शहरातील शंकरनगर चौक येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सावकरांवरील वक्तव्याचा निषेध करत जोरदार आंदोलन केले. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप (Rahul Gandhi insult savarkar) भाजयुमो कार्यकर्त्यांनी केला आहे.

BJYM Protest
BJYM Protest
author img

By

Published : Oct 10, 2022, 4:41 PM IST

Updated : Oct 10, 2022, 5:08 PM IST

नागपूर: भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) (BJYM) नागपुरने शहरातील शंकरनगर चौक येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सावकरांवरील वक्तव्याचा निषेध करत जोरदार आंदोलन केले. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप (Rahul Gandhi insult savarkar) भाजयुमो कार्यकर्त्यांनी केला आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे आंदोलन

आंदोलकांचा राहुल गांधींना इशारा: आंदोलकांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना आणखी उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलक म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घ्यायचे, संघाने ब्रिटिशांना मदत केली अश्या प्रकारची अतिशय चुकीची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. अश्या प्रकारे राहुल गांधी नेहमीच बरळत असतात. त्यांनी असे चुकीचे वक्तव्य करणे त्वरित थांबवावे, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा येणाऱ्या काळात यापेक्षा ही अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल." यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या पुतळ्याचे दहन केले.

BJYM Protest
राहुल गांधींचा पुतळा जाळला

राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रे दरम्यान सावकरांवर हे आक्षेपार्य विधान केले होते. राहुल गांधींवर या विधानावर भाजप नेत्यांकडूनही चोहुबाजूने टीका होते आहे.

Last Updated : Oct 10, 2022, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.