ETV Bharat / city

Emitted Polluted Ash : राखमिश्रित पाणी ठरतेय आरोग्याला हानिकारक; परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांची लागण

नागपूर जिल्ह्यातील ( In Nagpur District ) कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामुळे राखेचे प्रदूषण अनेक वर्षांपासून पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून, अविरत सुरू आहे. कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही औष्णिक वीज ( Koradi and Khaparkheda Thermal Power Plants ) प्रकल्पातून निघणाऱ्या राखेमुळे राख बंधार आणि वीज केंद्राच्या परिसरतील अनेक गावे प्रदूषणाचे गंभीर परिणाम सोसत आहे. ( Center for Sustainable Development ) पावसाळ्यात खसाळा राख बंधारा फुटून आणि खापरखेडा पाईपलाईन फुटून राख नदीत पोहचली. हेच पाणी शरीरात जाऊन धोकादायक ठरत आहे.

koradi and Khaparkheda Emitted Polluted Ash
कोराडी आणि खापरखेडा प्रकल्पातून निघणारी राख
author img

By

Published : Aug 6, 2022, 1:16 PM IST

नागपूर : कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही औष्णिक वीज ( Koradi and Khaparkheda Thermal Power Plants ) प्रकल्पातून निघणाऱ्या राखेमुळे राख बंधारा आणि वीज केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरतील अनेक गावे प्रदूषणाचे गंभीर परिणाम सोसत होते. तेच पावसाळ्यात खसाळा राख बंधारा फुटून ( Khasala Rakh Dam Burst ) आणि खापरखेडा पाईपलाईन फुटून राख नदीत पोहचली. हेच पाणी शरीरात जाऊन धोकादायक ठरत आहे. नागपुरातील पर्यावरण आणि लोकांच्या आयुष्यावर झालेल्या दुष्परिणामाचा अभ्यास सेंटर फॉर सस्टनेबल डेव्हलपमेंट ( Center for Sustainable Development ) या संस्थेच्या संचालिका लीना बुद्धे ( Director Leena Budhe ) यांनी केला. हे राखमिश्रित पाणी किती जीवघेणे ठरत आहे जाणून घेऊया ई-टीव्ही भारतच्या खास रिपोर्टमधून.

कोराडी आणि खापरखेडा प्रकल्पातून निघणारी राख

कोराडी बंधारा फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीला फटका : यंदाच्या पावसामुळे कोराडी औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा 16 जुलै रोजी फुटला. हा बंधारा 341 हेक्टरवर विस्ताराला आहे. अचानक पाऊस वाढल्याने बंधारा फुटला, त्यामुळे खसाळा, खैरी, सुरादेवी, म्हसाळा कवठा या पाच गावांत भयानक चित्र यावेळी पाहायला मिळाले. आजूबाजूच्या गावातील शेतीत राखेचा चिखल झाला. हे कमी होते की काय, 24 जुलै रोजी खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून राखेचे वहन करणारी पाइपलाइनला गळती लागल्याचे समोर आले. दोन्ही घटनांमुळे प्रदूषित राख नदीच्या लाखो लिटर पाण्यात मिश्रित झाली.

Ash Water is Dangerous
राखमिश्रित पाणी धोकादायक

आरोग्यावरही दुष्परिणाम : राखेचा बंधारा फुटून राखेच्या चिखलामुळे शेतजमीन उद्ध्वस्त झाली. शिवाय जमिनीतील जलसाठा नदी-नाल्यांचे प्रदूषण होऊन पर्यावरणीय नुकसान झाले. यातच मागील अडीच वर्षांपासून औष्णिक वीज केंद्राच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या "सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेतील अभ्यासकांच्या मते राख गळतीचे दृश्य परिणामापेक्षा आरोग्यावरील अदृश्य परिणाम जास्त गंभीर असल्याचा दावा केला आहे. या अभ्यासात शरीरासाठी घातक हेवी मेंटल्स, अल्युमिनियम, अँटीमनी, कॅडमियम, बोरॉन, आरसेनिक, लिथिनियम, सिलिनियम, वेनेडियम आणि मर्क्युरीसारख्या धातूंचा समावेश आहे.

Ash Water is Dangerous
राखमिश्रित पाणी धोकादायक

प्रदूषित पाण्याचा मानवासह मुक्या जीवनावरही फटका : नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामुळे राखेचे प्रदूषण अनेक वर्षांपासून पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून, अविरत सुरू आहे. यामध्ये असर, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएफएसडी) आणि मंथन अध्ययन केंद्र अशा या तिन्ही संस्थांनी आजूबाजूच्या 21 गावांतील पाण्याचे नमुने घेऊन केलेल्या तपासणी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्सच्या अहवालात मानांकापेक्षा कितीतरी पटीने अधिक जास्त प्रमाणात हेवीमेटल्स मिळून आले.

Ashes Reached the River
राख नदीत पोहचली

आजूबाजूच्या गावांतील स्थानिकांना मोठमोठ्या रोगांनी ग्रासले : यातून कर्करोग, श्वसनरोग, किडनीस्टोनसारख्या गंभीर आजाराशी लढा देत आहेत. या प्रदूषणामुळे मानवच नाही, तर परिसरतील गुरे-ढोरे, पाळीव प्राणी, पशु-पक्ष्यांनासुद्धा यातना सहन कराव्या लागत आहे. अनेकांना अल्झायमरसारखे आजारही होत आहे. त्याचबरोबर हाडे ठिसूळ होत असल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्या समस्यांना समोर जावे लागत आहे. आरोग्यावरील विपरित परिणामास समोर येण्यास काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. यात सुरादेवी, वारेगाव गावामध्ये जवळपास 80 टक्के लोक किडनी स्टोनचे रुग्ण असल्याचे सुरादेवीचे सरपंच सुनील दुधपचारे यांनी ई-टीव्हीशी बोलताना सांगितले.

Ash Water is Dangerous
राखमिश्रित पाणी धोकादायक

नदीत राख सोडू नये : वारेगाव येथील रोहिणी जनई सांगतात की, मोठ्या प्रमाणात समस्यांना रोजच तोंड देत जीवन जगावे लागते. त्यामुळे पिण्याचे पाणी असो की, हवा, सर्वत्र राखेचे कण असतात. त्यामुळे आमचे लहान मुलेसुद्धा याच परिस्थितीतून रोज जीवन जगत आहे. त्यामुळे नदीत सोडत असलेली राख सोडू नये, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सामान्यपणे जीवन अत्यंत खराब झाले आहे.

Pollution Due to Ash Dam Burst
राखेचा बंधारा फुटल्याने प्रदूषण

बरं झाले ती घटना संध्याकाळी घडली नाही : म्हसाळा राख बंधारा फुटण्याची घटना भरदिवसा घडली. त्यामुळे तत्काळ उपाययोजना सुरू झाली आहे. पण लोकांनी त्या नाल्यात जाणारा प्रवाह कॅनालमध्ये केल्याने नुकसान कमी झाले. पण, ही घटना जर का मध्यरात्री सगळे झोपेत असताना झाली असती, तर नक्कीच मोठा अनर्थ घडला असता, अशी भावना खसाळा येथील रहिवासी विद्या फाये यांनी सांगितले.

ओसिडब्ल्यूने पाण्याचे परीक्षण करण्याची गरज आहे : कोलार आणि कन्हान नदीतून नागपूरकरांना पिण्याचा पाणी पुरवठा होतो. या दोन्ही नद्या राखेच्या गळतीच्या दुर्घटनांमुळे प्रदूषित झाल्यामुळे नागपूर महापालिकेने आणि महापालिकेसाठी पिण्याचा पाणी पुरवणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीने जलशुद्धीकरण केंद्र खरोखरच या हेवी मेटल्सला पाण्यातून वेगळे करण्याची क्षमता ठेवते का? याची तपासणी करण्याची गरज असल्याचेही सेंटर फॉर सस्टनेबल डेव्हलपमेंटच्या संचालिका लीना बुद्धे यांचे म्हणणे आहे.

चौकशीतून कठोर कारवाईची गरज : यात नागपूरच्या प्रकरणाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ही घटना अतिशय गंभीर असून, त्याकडे गांभीर्याने पाहिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच, भविष्यात अशा पद्धतीच्या चुका होऊ नये याची काळजी घेऊ. तसेच, जो कोणी दोषी असेल त्यासाठी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री नागपुरात सांगिलते.

या प्रकरणी कारवाई होणे अपेक्षित : या प्रकरणावर चौकशी समिती नेमली गेली का? आणि नेमली गेली असेल, तर काय कारवाई झाली? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन होत नसल्याने त्याचे उल्लंघन झाले म्हणून कठोर करवाई झाली. तरच भविष्यात अशा घटना घडण्यापासून रोखल्या जाऊ शकतात, असेही मत सीएफएसडीच्या संचालिका लीनाबुद्धे यांनी ई-टीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

हेही वाचा : Governor Koshyari controversial statement : मोदींपूर्वी भारतीयांना जगात जो मान.. या विधानामुळे राज्यपाल पुन्हा ठरले टीकेचे धनी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.