नागपूर- पोलिसांची नेहमीची नाकाबंदी सुरू असताना गाड्यांची तपासणी सुरू होती. त्याचवेळी एका स्कोडा कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न ( Unruly Car Driver ) वाहतूक पोलिसांनी केला असता, कार चालकाने गाडी न थांबता वाहतूक पोलिसांच्या अंगावर ( Driver Hit Traffic Police ) घातली. नागपुरातील पंचशील चौकामध्ये ( Panchashil Chowk Nagpur ) ही घटना घडली.
व्हिडीओ नागपुरात व्हायरल
या घटनेचा व्हिडियो सध्या नागपुरात चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान कारचालकाने पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवर फरफटत नेले. कार चालकासोबत गाडीत त्याची पत्नी होती. ती व्यक्ती मधुमेह रुग्ण असल्याचे पोलिसांना सांगितले. या व्यक्तीवर वाहतूक नियम मोडण्याची कारवाई करून सोडून देण्यात आले आहे.
सुदैवाने अपघात टळला
कार चालकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घातल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत कारच्या बोनेटवर उडी घेतली. त्यानंतर तो वाहनचालक गाडी थांबवण्याऐवजी पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवर बसवून काही अंतरापर्यत घेऊन गेला. सुदैवाने तो वाहतूक पोलीस कर्मचारी खाली पडली नाही. त्यामुळे सुदैवाने अपघात टळला आहे. या घटनेचा व्हिडियो चांगलाच व्हायरल होत आहे.