ETV Bharat / city

उपराजधानीत सहा परिसर सील; कोरोनाबाधितांची वाढली संख्या

सध्या, नागपुरातील सर्व दहा क्षेत्रांमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, याकरिता हे सर्व परिसर सील करण्यात आले आहेत.

Prohibited zones in Nagpur
सीलबंद क्षेत्र
author img

By

Published : Jun 8, 2020, 1:00 PM IST

नागपूर - उपराजधानीच्या विविध भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने गेल्या २४ तासात महानगरपालिकेने शहरातील सहा वस्त्या सील केल्या आहेत.

सध्या, नागपुरातील सर्व दहा क्षेत्रांमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, याकरिता हे सर्व परिसर सील करण्यात आले आहेत. त्यामध्ये सतरंजीपुरा क्षेत्रामधील स्वीपर मोहल्ला, बिनाकी सोनार टोलीचा समावेश आहे. तर सोमवारी गड्डीगोदाम परिसरातील शबरीमाता नगर गोरेवाडा, धंतोली क्षेत्रामधील चंद्रमणी नगर आणि धरमपेठ क्षेत्रामधील एस. के. बॅनर्जी मार्ग हे परीसर सील केले आहेत. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश दिल्यानंतर हे परिसर सील करण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच प्रशासनाची चिंतादेखील वाढली आहे. तब्बल अडीच महिने टाळेबंदीचे काटेकोर पालन केल्यानंतर अनेक आस्थापने सुरू झाली आहेत. रस्त्यांवर वर्दळदेखील दिसू लागली आहे. त्यामुळे नागपपुरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा धोकादायक वाटू लागला आहे.

दरम्यान, अन लॉकडाऊन -1 प्रमाणे राज्य सरकारने आजपासून नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे उपाहारगृहे, खासगी कार्यालय व प्रार्थनास्थळे हे काही अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.