ETV Bharat / city

तब्बल एका दशकांनंतर उपराजधानीत मे महिन्यात कमी तापमानाची नोंद - नागपूर मे महिन्याचे तापमान

मे महिन्यात नागपुरात प्रचंड तापमान नोंदवल्या जाते. पण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मात्र तापमान सरासरीपेक्षा किमान चार अंशांनी कमी असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत दरम्यान झालेला पाऊस आणि त्यामुळे जवळपास रोजच निर्माण होणारे दमट हवामान यामुळे तापमान वाढले नाही, असे हवामान विभागाचे गौतम नगराळे यांनी सांगितले.

After a decade nagpur recorded a low temperature in May
तब्बल एका दशकांनंतर उपराजधानीत मे महिन्यात कमी तापमानाची नोंद
author img

By

Published : May 27, 2021, 7:39 AM IST

नागपूर - गेल्या काही वर्षात तापमानात पाहता मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. यात मे महिना तर इतका तापतो की अंगाची लाही लाही होते. पण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मात्र तापमान सरासरीपेक्षा किमान चार अंशांनी कमी असल्याचे दिसून येत आहे. यामागील नेमके काय कारण आहे हे जाणून घेऊ या खास रिपोर्टमधून..

मे महिन्यात नागपुरात प्रचंड तापमान नोंदवल्या जाते. यात सूर्य नारायण कोपले की काय, असे म्हणण्याऐवजी यंदा मात्र पावले की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. याचे कारण म्हणजे जिथे मागील वर्षात(2020) मध्ये तापमान 1 मे रोजी 41.3 अंश होते. तेच यंदा(2021)मध्ये 1 मे रोजी तापमान 40 अंशावर होते. यात 5 मे 2020 रोजी तापमान 44.8 अंश नोंदवले असतांना यंदा 5 मे 2021 रोजी तापमान केवळ 41.9 टक्के इतके तापमान होते. तेच तापमान कमी अधिक होत 27 मे 2020 रोजी तापमान वाढून 46.8 वर जाऊन पोहचले. यंदा 2021 मध्ये तापमान सर्वाधिक कमी तापमान 41.9 हे तापमान आतापर्यंत सर्वाधिक असून 42.2 अंश तापमान 12 मे रोजी नोंदवण्यात जे मे महिन्यात सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे मागील दहा वर्षात इतके कमी तापमान कमी असल्याचे नोंद झाली नसल्याच्या दावा हमवामान विभागाचे वैज्ञानिक गौतम नगराळे यांनी बोलतांना सांगितले आहे.

नवतपा म्हणजे नेमके काय..
प्राचीन काळापासून लोकांना हवामानाचा अभ्यास होत आहे. सूर्य, चंद्राचे भ्रमंनमार्ग, तारे, ग्रह ह्यांचे वर्षभरातील मार्ग, पावसाचे नक्षत्र आणि अत्याधिक तापमानाचे दिवसाची माहिती प्राचीन खगोल अभ्यासकांना होती. "नवतपा" हा त्यातील एक भाग असून मंगळावर 25 मे पासून नवतपा सुरू झाला आहे आणि 3 जूनपर्यंत असणार आहे. या काळात विदर्भाचे तापमान प्रचंड वाढते. ज्येष्ठ महिन्यात जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो. तेव्हा नवतपाला सुरुवात होते आणि पुढचे नऊ दिवस पारा तीव्रतेने वाढत जातो.

गेल्या वर्षी आणि या वर्षी नागपुरातील तापमानाची तुलना -

तारीख २०२० २०२१

२१ मे ४४.२ अंश ३९.० अंश

२२ मे ४४.५ अंश ४०.९ अंश

२३ मे ४५.६ अंश ३९.९ अंश

२४ मे ४६.५ अंश ४१.३ अंश

२५ मे ४६.७ अंश ३९.४ अंश

२६ मे ४७.० अंश ४२.० अंश

कमी तापमान कशामुळे -

उन्हाळा जास्त तापला की, चांगला पाऊस पडतो. पण यंदा हे हवामान कमी असण्यामागे नेमके कारण काय आणि कशाचा परिणाम झाला, याबाबत हवामान विभागाचे गौतम नगराळे यांच्याशी चर्चा केली. ते सांगतात, यावर्षी मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत दरम्यान झालेला पाऊस आणि त्यामुळे जवळपास रोजच निर्माण होणारे दमट हवामान कारणीभूत ठरले. दरम्यान, असा कमकुवत उन्हाळा अनेक दशकानंतर अनुभवायला येत असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. हवामान विभागाच्या मते उन्हाळ्यातील तापमान, त्यामुळे जमीन तापणे आणि पावसाचा संबंध असतो, मात्र दमदार मान्सूनसाठी इतर अनेक निकष ही कारणीभूत असतात. यंदा ते इतर निकष स्पष्ट जाणवत असल्याने पाऊस समाधानकारक होईलच असे हवामान विभाग वैज्ञानिक गौतम नगराळे यांनी सांगितले.

तापमान नऊतापात भरून निघणार का?..

नवतपा संपायला अजून सात दिवस बाकी आहेत. या सात दिवसात विदर्भाचा तापमान अनुशेष भरून निघणार का? मात्र, हवामान विभागाच्या मते मान्सून अंदमान आणि केरळच्या तटाजवळ पोहोचल्यामुळे आता तापमान खूप काही वाढू शकणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.