नागपूर - शहरात कोरोनाच्या एका नव्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. या नव्या कोरोना रुग्णामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 107 वर पोहचली आहे. आज दिवसभरात 2 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोन्ही रुग्ण सतरंजीपुरा येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. उपचारासाठी या रुग्णाला शासकीय मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात रुग्णसंख्या वाढत असताना दिलासा देणारी बातमी आहे. नागपुरातील 5 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेऊन हे रुग्ण कोरोना पासून मुक्त झाले. आज या पाचही रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. नागपुरातील कोरोना चे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा मधील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. रुग्णालयातून सुट्टी झाल्यावरही त्यांना पुढील 14 दिवस नियमाप्रमाणे घरीच होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे.
नागपुरातील 25 एप्रिलची कोरोना बधितांची आकडेवारी -
एप्रिल एकूण पॉझिटिव्ह नमुने - | 107 |
मृत्यू - | 01 |
बरे झालेले रुग्ण - | 22 |
उपचार घेणारे रुग्ण - | 84 |