ETV Bharat / city

Robbery Near SBI Bank : बँकेसमोरून वृद्ध दाम्पत्याची ५ लाखाची रोकड लुटून आरोपी फरार, नागपुरात एसबीआय बँकेसमोरील घटना - robbing of elderly couple of Rs 5 lakh

घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर ( PI Umesh Besarkar ) आणि त्यांचा स्टाफ घटनास्थळी दाखल झाला. आरोपी हे घटनास्थळावरून हिंगणा मार्गाकडे ( Hingana road ) गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त लोहित मतानी ( Police DCP lohit Madani ) यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली.

वृद्ध दाम्पत्य
वृद्ध दाम्पत्य
author img

By

Published : Mar 3, 2022, 8:05 PM IST

नागपूर - ५ लाख रुपयांची रोकड पिशवीत ठेवणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचे पैसे बाईकस्वार चोरांनी पळविले ( Robbery of Rs 5 Rupees ) आहेत. ही घटना नागपूर शहरातील एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेसमोर दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली ( Nagpur crime news ) आहे.

पोलिसांनी हिंगणा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे. हिंगणा येथे राहणारे मीना आणि शिवप्रसाद विश्वकर्मा या वृद्ध दाम्पत्याचे पाच लाख रुपये आरोपींनी लुटले आहे.

हेही वाचा-Eknath Khadse On BJP : भाजपचे दहशतवाद्यांशी संबंध; एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप

शिवप्रसाद हे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक

शिवप्रसाद हे राज्य राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक आहेत. घराच्या बांधकामासाठी ते आणि त्यांच्या पत्नी सोबत स्कुटरने एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून ५ लाख रुपये काढल्यानंतर त्या पिशवीत ठेवून पत्नीच्या हातात ती पिशवी दिली. बँकेच्या बाहेर रस्त्यावर ठेवलेली स्कुटर सुरू करीत असताना मागून आलेल्या मोटर सायकलवमवरील दोन आरोपींनी मीना यांच्या हातातील ती पिशवी हिसकावून पळ काढला.

हेही वाचा-Maharashtra Budget Session 2022 : विरोधक नव्हे तर सत्ताधारीच आक्रमक; 'असा' राहिला अधिवेशनाचा पहिला दिवस

सीसीटीव्ही व्हिडीओच्या आधारे आरोपींचा शोध सुरू
घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर ( PI Umesh Besarkar ) आणि त्यांचा स्टाफ घटनास्थळी दाखल झाला. आरोपी हे घटनास्थळावरून हिंगणा मार्गाकडे ( Hingana road ) गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त लोहित मतानी ( Police DCP lohit Madani ) यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली. आरोपी हे बँकेमधूनच शिवप्रसाद यांचा पाठलाग करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे ज्या मार्गाने आरोपी पळाले त्या मार्गावरील सीसीटीव्ही आणि बँकेतील सुद्धा सिसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.