ETV Bharat / city

नागपुरात होणार एबीव्हीपीचे 66वे अधिवेशन, कोरोनामुळे डिजिटल स्वरूप

author img

By

Published : Dec 24, 2020, 5:19 PM IST

Updated : Dec 24, 2020, 7:32 PM IST

दोन दिवसीय अधिवेशन डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसर रेशीमबाग येथे 25 आणि 26 डिसेंबरला होणार आहे. या अधिवेशनात देशभरातील विविध प्रांताचे पदाधिकारी सहभागी होणार आहे. पण यात केवळ केंद्रीय समितीचे प्रत्यक्ष 80 पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

Nagpur
Nagpur

नागपूर - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 66वे अधिवेशन नागपुरात होऊ घातले आहे. हे दोन दिवसीय अधिवेशन डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसर रेशीमबाग येथे 25 आणि 26 डिसेंबरला होणार आहे. या अधिवेशनात देशभरातील विविध प्रांताचे पदाधिकारी सहभागी होणार आहे. पण यात केवळ केंद्रीय समितीचे प्रत्यक्ष 80 पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

80 जण सहभागी होणार

66 वे राष्ट्रीय अधिवेशार कोरोनाचे सावट असल्याने यात केवळ प्रत्यक्ष नागपुरात 80 जण सहभागी होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यात दुसऱ्या दिवशी सन्मान सोहळा असणार आहे. यात बिहार राज्यातील मनीष कुमार यांना एबीव्हीपीचा मानाचा समजला जाणारा प्रा. यशवंतराव केळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. युवकांसाठी आणि कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा सन्मान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून यात एक लाख रोख आणि सन्मानचिन्ह दिले जाणार असल्याचे राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांनी दिली.

देशभरात लागणार 4 हजार स्क्रिन 1लाख 50 हजार लोक जुळणार 24 वर्षांनंतर होणार नागपुरात अधिवेशन

1949 अधिवेशनाला सुरवात झाली. यात नागपूरात जवळपास 3 वेळा अधिवेशन झाले आहे. 1982, 1964 आणि 1995मध्ये अधिवेशन झाले आहे. आता तब्बल 24 वर्षांनी 66वे अधिवेशन नागपूरच्या भूमीत होणार आहे. दरवर्षी भव्यदिव्य असणारे हे अधिवेशन यंदा कोरोनाच्या सावटामुळे साध्या पद्धतीने प्रत्यक्ष जरी 80 पदाधिकऱ्यां उपस्थिती होणार असले, तरी यात डिजिटल माध्यमातून जवळपास 1 लाख 50 हजार पदाधिकारी जिल्हास्तरापासून जुडणार आहे. या माध्यमातून वर्षभरात असणाऱ्या कामावर माहिती दिली जाणार आहे.

विविध विषयांवर होणार चर्चा

या 66व्या अधिवेशनात वर्षभरातील 4 प्रमुख विषयावर चर्चा होणार आहे. यात राष्ट्रीय भावना उजागर करणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची त्वरित अंमलबजावणी करणे, सध्याची राष्ट्रीय स्थिती, समृद्ध भारताची ओळख, राष्ट्रीय भारत, कोरोना आणि भारत या विषयांवर अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती विदर्भ प्रांत मंत्री रवी दांडगे यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली.

Last Updated : Dec 24, 2020, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.