ETV Bharat / city

नागपूर रेल्वे स्थानकावर संशयित व्यक्तीकडून 60 लाखाची रक्कम जप्त - income tax

नागपुरातील मुख्य रेल्वे स्थानकावर एका संशयित व्यक्तीकडून 60 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. जी.टी.एक्सप्रेसमधून इटारसी येथून ही व्यक्ती नागपुरात आली होती. आरपीएफ जवानांना संशयास्पद हालचाली दिसून आल्याने, तपासणी केली असता हा प्रकार समोर आला.

60 लाखाची रक्कम जप्त
60 लाखाची रक्कम जप्त
author img

By

Published : May 22, 2021, 8:15 PM IST

नागपूर - नागपुरातील मुख्य रेल्वे स्थानकावर एका संशयित व्यक्तीकडून 60 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. जी.टी.एक्सप्रेसमधून इटारसी येथून ही व्यक्ती नागपुरात आली होती. आरपीएफ जवानांना संशयास्पद हालचाली दिसून आल्याने, तपासणी केली असता हा प्रकार समोर आला.

संशयित व्यक्तीकडून 60 लाखाची रक्कम जप्त

नागपुरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर संशयास्पद फिरत असलेल्या एका व्यक्तीला आरपीएफ जवानांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडील बॅगमध्ये ६० लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. शब्बीर हुसेन हसन अली कारंजावाला असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मध्यप्रदेशच्या इटारसी येथून ही रक्कम आणल्याची माहिती आरपीएफच्या तपासात पुढे आली आहे. यासंदर्भात शब्बीर हुसेन हसन अली कारंजावाला यांच्याकडे चौकशी केली तेव्हा, ही रक्कम गांजा खेत येथील इस्माईल अँड सन्स यांची असल्याचे सांगितले. आरपीएफच्या पथकाने सर्व कागदी कारवाई केल्यानंतर ६० लाख रुपये आयकर विभागाकडे सोपवले आहेत. मात्र रक्कम कशासाठी आणण्यात आली यासह अनेक प्रश्नांची माहिती मिळाली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.