नागपूर - नागपुरातून एक धक्कादायक घटना घटना समोर आली ( Nagpur Rape Case ) आहे. एका आठ वर्षीय गतिमंद मुलीवर 42 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केला ( Mentally Challenged Girl Raped In Nagpur ) आहे. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी इमामवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुरज लोखंडे असे आरोपीचे नाव आहे.
रामबाग परिसरात रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. पीडित गतीमंद मुलगी घराबाहेर खेळत होती. तेव्हा आरोपी सुरजने तिला आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित कुटुंबीयांना माहिती मिळताच इमामवाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पीडितेला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे तिच्यावर उपचार सुरु आहे.
आरोपीची पत्नी सोडून गेली
आरोपी सुरज लोखंडे सध्या एकटाच राहत आहे. त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. तर, त्याचा मुलगा मारहाणीच्या गंभीर गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत आहे. या घटनेत आरोपीला आणखी कोणी मदत केली तर नाही ना, याची चौकशी पोलीस करत आहे.
हेही वाचा - Angadiya Extortion Case : अंगडिया वसुली प्रकरणात मोठी कारवाई; उत्तरप्रदेशातून एकास अटक