ETV Bharat / city

नागपुरात दोन लाखांचे १२ मोबाईल जप्त; लोहमार्ग पोलीसांची कारवाई - लोहमार्ग पोलीसांची कारवाई

नागपूर लोहमार्ग पोलीसांनी मौदा येथून नसीब अजाबराव वाघमारे नामक एक आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडे १२ महागडे मोबाईल जप्त केले असून, याची किंमत दोन लाख रुपये इतकी आहे.

nagpur
दोन लाखांचे १२ मोबाईल जप्त
author img

By

Published : Aug 27, 2021, 8:01 PM IST

नागपूर - रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील एका अट्टल चोरट्याला नागपूर लोहमार्ग पोलीसांनी अटक केली आहे. ट्रेन स्टेशन वर येण्याआधी आऊटरला उभी असताना अथवा हळू होते तेव्हा हे चोरटे दारात उभे असलेल्या प्रवासाच्या हातावर काठीने वार करून मोबाईल खाली पाडतात. गेल्या काही दिवसात मोबाईल घेऊन आरोपी पळून जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा मौदा येथून नसीब अजाबराव वाघमारे नामक एक आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडे १२ महागडे मोबाईल जप्त केले असून, याची किंमत दोन लाख रुपये इतकी आहे. या मोबाईल चोरणाऱ्या टोळीत आणखी काही सदस्य असून त्यांचा शोध लोहमार्ग पोलिसांनी घेत आहेत.

दोन लाखांचे १२ मोबाईल जप्त

चौकशीअंती एका लोहमार्ग पोलिसांना एका संशयीत आरोपीचा गुप्त माहिती प्राप्त झाली. हा आरोपी मौदा येथे असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर संशयित आरोपीला साफळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे १२ मोबाईल मिळुन आले. आरोपी नसीब अजाबराव वाघमारेची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने मोबाईल चोरीचे गुन्हे आपल्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली आहे.

प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी
गेल्या काही काळात धावत्या रेल्वेमधून मोबाईल चोरीच्या अनेक घटना वाढल्या आहेत. चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याने रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी विशेष सावधगिरी बाळगावी असे आवाहन लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, अनेक वेळा प्रवाशांच्या निष्काळजीपणा देखील चोरीच्या घटनांसाठी कारणीभूत ठरत आहे
हेही वाचा - वाईच्य‍ा हरिहरेश्वर सहकारी बँकेत ३७ कोटी ४६ लाखांचा अपहार; संचालक मंडळाविरोधात गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.