ETV Bharat / city

उपराजधानीत कोरोनानंतर डेंग्यूचे थैमान; पंधरा दिवसात १०६४ डेंग्यूचे रुग्ण

नागपूर शहरामध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) ७९९७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३७३ घरांमध्ये डेंग्यूअळी आढळली तर ६८ रुग्ण आढळून आले. १४३ जणांच्या रक्ताचे नमुने तर २७ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. हीच परिस्थिती रोजच्या सर्वेक्षणातून पुढे येत असल्याने चिंता वाढली आहे.

DENGUE CASES IN NAGPUR
उपराजधानी कोरोनानंतर डेंग्यूचे थैमान
author img

By

Published : Aug 5, 2021, 9:07 AM IST

नागपूर - डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू आहे. याअंतर्गत घरांघरांमध्ये जाऊन मनपा पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. डेंग्यू संदर्भात आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. १६ जुलै ते ३१ जुलै दरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ९८ हजार घरांपैकी ५९२९ घरे ही दुषित आढळली आहेत. म्हणजे, या घरांमध्ये डेंग्यूअळी आढळून आल्याची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे सर्वेक्षणामध्ये १०६४ ताप असलेले रुग्ण आढळून आले आहेत. तर, २६४७ जणांच्या रक्ताचे नमुने तर १४९ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत.

उपराजधानीत कोरोनानंतर डेंग्यूचे थैमान

५४०८ कुलर्समध्ये आढळली डासअळी -

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच गेल्या महिन्यापासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात डेंग्युच्या आजाराने डोकेवर काढले आहे. शेकडोंच्या संख्येने डेंग्यूच्या तापाने रुग्ण फनफनत असल्यामुळे नागपूर महानगरपालिकेने सर्व घरांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षणादरम्यान ३८ हजार ३४० घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात ५४०८ कुलर्समध्ये डासअळी आढळून आल्या आहेत. मनपाच्या चमूद्वारे २३२९ कुलर्स रिकामे करण्यात आले आहेत. ११ हजार ४७८ कुलर्समध्ये १ टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर २१ हजार ४८९ कुलर्समध्ये २ टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आल्या आहेत. तसेच, ३०४४ कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.

नागपूर शहराला डेंग्यूचा विळखा -

नागपूर शहरामध्ये ३ ऑगस्ट रोजी ७९९७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३७३ घरांमध्ये डेंग्यूअळी आढळली तर ६८ रुग्ण आढळून आले. १४३ जणांच्या रक्ताचे नमूने तर २७ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. हीच परिस्थिती रोजच्या सर्वेक्षणातून पुढे येत असल्याने चिंता वाढली आहे.

नागरिकांनी नियम पाळणे महत्वाचे -

शहरात डेंग्यूचा प्रसार वाढू नये यासाठी मनपाद्वारे उपाययोजनात्मक जनजागृती सुरू आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून डेंग्यू प्रतिबंधात्मक काळजी घेण्याची गरज आहे. घरात कुठेही पाण्याची साठवण राहणार नाही याची काळजी घ्यावी. पिण्याच्या पाण्याची भांडी व्यवस्थित झाकून ठेवावीत. परिसरात कचरा असल्यास तो साफ करून घ्यावा. स्वच्छता आणि सतर्कता हीच कडी आपल्याला डेंग्यूपासून बचावासाठी महत्वाची आहे, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले आहे.

हेही वाचा - नागपुरात घरात घुसले सशस्त्र दरोडेखोर, महिलेच्या सतर्कतेने डाव उधळला; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

हेही वाचा - कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पाहुण्यांना दोषी ठरवता येत नाही - नागपूर खंडपीठ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.