नागपूर - वयाची पन्नाशी गाठली तरी मन चिरतरुण असल्यास मोठ्यातले मोठं आव्हानं सहज पेलल्या जाऊ शकते. हाच संदेश देणारी अरुणाचल प्रदेश ते लेह-लडाखपर्यंतची 4 हजार 977 किलोमीटरची हिमालयीन सर ( Trekking in The Himalayas ) करणारी मोहीम आहे. या पद्धतींची देशातील महिलांची पहिलीच मोहीम आहे. जागतिक महिला दिनी दिल्लीतून या मोहिमेला सुरवात होत आहे. देशभरातील 10 महिला गिर्यारोहक या पाच महिन्याची बर्फाळ प्रदेशातील आव्हानात्मक मोहीम कशी असणार जाणून घेऊन या मोहिमेतील सदस्य बिमला नेगी देऊस्कर यांच्याकडून.
10 महिला पायदळी पार करणार हिमालय एकदा पन्नाशी ओलांडली की आराम करण्यासाठी निवृत्ती घेत आपले आयुष्य जगायला सुरुवात करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण या उलट एक विचार मांडून वयाच्या पन्नाशी नंतरही मन उत्साही ठेवून जगता येऊ शकते. वयाचे 50 वर्ष ओलांडले म्हणून शांत न बसू नये. हा संदेश पहिल्या महिला गिर्यारोहक तथा पद्मभूषण बछेन्द्री पाल यांनी दिला. या विचाराला भारावून जात महिला गिर्यारोहक यांनी सहभाग घेतला.
वयाची पन्नाशी जवळ आली तरी मन तरुण असलेल्या या महिला हिमालय सर करणार जागतिक महिला दिनी 8 मार्चला मोहिमेला फ्लॅग मार्च होईल त्यानंतर 12 मार्चपासून अरुणाचल प्रदेशाच्या पांगसू खोऱ्यातून ही पायदळ चालणारी मोहीम सुरू होणार आहे. पुढे ही मोहिम पाच महिने चालणार आहे. यात सात सात दिवसाचे टप्पे करण्यात आले आहे. यात अरुणाचल प्रदेश ते आसामपर्यंतचे अंतर 20 दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर आसाम, वेस्ट बंगाल, सिक्कीम, सिक्कीम सिंगालिला रेंज होत पुढे नेपाळ मध्ये पोहचणार आहे. सर्वाधिक 1 हजार 505 किलोमीटरचा भाग नेपाळ देशातून पार करत हिमाचल प्रदेश आणि शेवट हा लेह लडाखमध्ये पोहचत 4977 किलोमीटर हा ट्रेक पायदळ पूर्ण करणार आहे.
धाडसी प्रवासात शेकडो आव्हान -या ट्रेकमध्ये बहुतांश प्रवास हा बर्फाळ प्रदेशातून असणार आहे. त्यामुळे सर्व महिला वयाच्या 50 शी ओलांडलेल्या असल्याने त्यांच्यासमोर आव्हान तेवढेच कठीण असणार आहे. सर्वात मोठं आव्हान राहील ते म्हणजे थंड प्रदेशातुन स्वतःला सावरत पुढे पुढे प्रवास कायम ठेवणे आहे. पण या सर्व बाबीचा विचार करून तसेच पूर्व अनुभवातून पूर्ण तयारीनिशी मोहिम पार केली जाणार असल्याचे सांगतात. पण या मोहिमेत खाण्या पिण्याचे लागणारे साहित्य तसेच मुक्कामाच्या ठिकाणी टेन्टमध्ये निवासाची व्यवस्था इतर सोयी असो ते मिळवणे हे नक्कीच सोपी नसणार आहे. यात एका दरीतुन दुसऱ्या दरी खोऱ्यातून मार्ग काढताना 39 खिंड पार कराव्या लागणार आहे. यात सर्वात उंच ही फरांगला खिंड असल्याने सर्वात कठीण अनुभवही त्या भागातून अनुभवला मिळणार असल्याचेही सांगतात.
मोहिमेत जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा -यामध्ये इतर लोकांना सुद्धा सहभाग घेता येणार आहे. सात दिवसाच्या टप्प्यामध्ये इच्छुक गिर्यारोहक यांनी हिमालय सर करताना मोहिमेत सहभाग घेऊन वेगळा अनुभव मिळवण्याची संधी असणार आहे. तसेच पांढरा शुभ्र बर्फाळ भागातून प्रवासात वेगळा अनुभव देणारी ही मोहीम असणार आहे. तसेच वयाच्या पन्नाशीनंतर स्वतःला अधिक तंदुरुस्त ठेवण्यासाठी संदेश देणारी ही मोहीम आहे. त्यामुळेच फिट@ 50प्लस ट्रान्स हिमालय एक्सपेडिशन 2022 असे मोहिमेचे नाव आहे. या मोहिमेला टाटा स्टील अडव्हेचर् फाऊंडेशनच्या साह्याने आर्थिक साह्य केले आहे.
मोहिमेनंतर नक्कीच आयुष्य पालटले असे -पद्मभूषण बछेन्द्री पाल या मोहीम प्रमुख असून त्या नागपूरच्या बिमला नेगी देऊस्कर यांच्या आत्ये बहीण आहे. त्यांना लहानपणापासून बछेन्द्री दिदींना पाहून त्यांच्यासोबत अनेक मोहिम सर करण्याच्या अनुभव असल्याचेही बिमला सांगतात. त्यामुळे मोहिमेसाठी उत्सुक असून मोहिमेतून परतल्यावर वेगळा अनुभव असेल. ही मोहीम जगासमोर एक संदेश देणारी मोहिम असेल. जे सांगेल की मन तरुण असले तर काहीही अशक्य नाही आणि या मोहिमेचा भाग होऊ शकली यासाठी स्वतःला मी भाग्यवान समजत असल्याचे बिमला सांगतात. या मोहिमेंनंतर नक्कीच आयुष्य बदललेले असेल, असा विश्वास ही बिमला देऊस्कर बोलून दाखवतात.
यात सर्वाधिक वयाच्या 'तरुणी @67' वर्षाच्या -पन्नाशी पार महिलांचे या मोहिमेचे प्रमुख बचेंद्री पाल यांचे वय 67 वर्ष इतके आहे. तर सर्वात लहान महिला म्हणून छत्तीसगढ येथील सविता धवपाल आणि झारखंडच्या अन्नपूर्णा यांचे वय 53 वर्ष आहे. झारखंडचे पायो मुरमु यांचे 54 वर्ष वय आहे. तेच वेस्ट बंगालच्या चेतना साहू यांचे 55 वर्ष वय आहे, नागपूरच्या बिमला देऊस्कर यांचे 56 वर्षाचा असून राजस्थानच्या डॉ. सुषमा बीसा 56 वर्षाचा आहे. उत्तर प्रदेशाच्या क्रीष्णा दुबे या 60 वर्षाचा आहे. गुजरात राज्यातील गंगोत्री सोनजी यांचे 63 वर्ष वय आहे. कर्नाटकच्या वसुमती श्रीनिवास या 67 वर्षाच्या आहे.
हेही वाचा - Shaheena Attarwala : शाहिना अत्तरवाला यांचा झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्टपर्यंतचा थक्क करणारा प्रवास