मुंबई- कोरोना संकटात काय होईल किती काळ लॉकडाऊनमध्ये घरात कोंडून राहायचे ही चिंता नागरिकांना सतावत असताना नशा करणारे मात्र एकमेकांचा जीव घेत आहेत. घाटकोपर पूर्व येथील एका स्कायवॉकवर गुरुवारी सकाळी 10 :30 वाजता सचिन सत्यवान आगळे वय 20 वर्षे याची हत्या करण्यात आली. त्याच्याकडील पैसेही नशा करण्यासाठी पैसे जबरदस्तीने काढून घेण्यात आले. पोलिसानी एका संशयित आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा- कोरोनाशी कर सुरु लढाई..! जनजागृतीसाठी 'ईटीव्ही भारत'चे खास मराठी गीत
घाटकोपर रेल्वेस्थानक पूर्वेतील साईबाबा मंदिराजवळील स्कायवॉक वरून मृत सचिन राहणार असल्फा घाटकोपर हा घरी जात असताना आरोपीने त्याला नशा करण्यासाठी काही पैशाची मागणी केली आणि त्याच्याकडील पैसे काढून घेतले. सचिन पैसे परत मागत असल्याने दोघात वाद झाला. आरोपीने सचिन यास लोखंडी पाईपने छातीवर, पायावर व पाठीवर मारहाण करून चाकूने गुदद्वारावर वार करून गंभीर जखमी केले होते.
पोलिसानी तात्काळ त्यास जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पंतनगर पोलीस करीत आहेत.
देशभर लॉकडाऊन व राज्यात संचारबंदी आहे, त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट असूनही नशा करणारे मात्र वाटेल ते करत आहेत. राज्यात व मुंबईत मागील काही दिवसांपूर्वी दारूची दुकाने व गोडाऊन फोडल्याच्या घटना घडल्या आहेत.