ETV Bharat / city

Travel Across India: एक लाख झाडे लावण्याचे स्वप्न मनात घेऊन युवक प्रदीप कुमारचे सायकलने भारतभर भ्रमण

एक लाख झाडे लावण्याचे स्वप्न Dream of Planting One Lakh Trees मनात घेऊन युवक प्रदीप कुमार यादव सायकलने तो देशाटन Pradeep Kumar Yadav India Tour Campaign करत आहे. नुकताच मुबंईत तो आला आणि ईटीव्ही भारतने त्याच्यासोबत संवाद साधला. जाणून घेऊया सविस्तरपणे.

author img

By

Published : Sep 17, 2022, 7:09 PM IST

एक लाख झाडे लावण्याचे स्वप्न मनात घेऊन युवक प्रदीप कुमारचे सायकलने भारतभर भ्रमण

मुंबई : आपण आपल्या समाजात पाहतो . कोणी आपली इमाने इतबारे नोकरी करतो. पण दहा ते पाचच्या कामा पलीकडे फारसे कोणी जात नाही. चाकोरी सोडून वेगळा मार्ग फारसा कोणी चोखाळत नाही . मात्र एक युवक आहे . जो सध्या महाराष्ट्रात आलाय आणि त्याने वेगळा मार्ग धरलेला. आहे आणि वेगळ्या मार्गातून वाट काढत महाराष्ट्राच्या वाटेला लागलाय. बिकट वहिवाट करायला तयार झाला. घरच्यांनी त्याला विरोध केला. मात्र त्यांचा विरोध पचवून त्यांना समजावून तो आपल्या देशाटनाच्या मोठ्या मोहिमेवर चालू लागला. आणि हे देशाटन म्हणजे सायकलने देशाटन. एक लाख झाडे लावण्याचे स्वप्न Dream of Planting One Lakh Trees मनात घेऊन युवक प्रदीप कुमार यादव सायकलने तो देशाटन Pradeep Kumar Yadav India Tour Campaign करत आहे. नुकताच मुबंईत तो आला आणि ईटीव्ही भारतने त्याच्यासोबत संवाद साधला. जाणून घेऊया सविस्तरपणे.

उमेदीच्या वयात धाडसी निर्णय - प्रदीप कुमार यादव . गाव हरपुर. तालुका जमानिया जिल्हा गाजीपुर .राहणार उत्तर प्रदेश व वय फक्त 21 वर्ष. त्याच्या घरात आई वडील दोन भाऊ आणि हा स्वतः प्रदीप असे छोटे कुटुंब .वडील शेती करतात. भाऊ नोकरी करतो. ऐपतीप्रमाणे प्रत्येक कुटुंबाचे काही विचार आणि निर्णय ठरतात. प्रदीप च कुटुंब शेतकरी त्याच्यामुळे थोडेफार शिकले की नोकरी लागलं की झालं आपलं सगळं.मुलाचे दोनाचे चार हात व्हावे ;अशी त्याच्या पालकांची इच्छा . मात्र प्रदीपच्या मनात काही वेगळंच होतं. हे त्याच्याशी बोलताना जाणवलं. त्याने आपल्या जगण्याची वाट या उमेदीच्या वयातच निवडणं हे वेगळे पाऊल म्हणता येईल . धाडस पण म्हणता येईल.केवळ १४० रुपये त्याने घरातून घेतले . त्याला बाकी काहीही खर्च लागत नाही हे विशेष ! गरजा कमी असल्या कि जीवन एकदम सोप्प होत त्याचा हा नमुना . सिद्धार्थ गौतम बुद्धाने देखील गरजा कमी असताना चांगलं जगता येतं हे जगाला दाखवून दिलेच आहे . म्हणून तर अवघे जग त्या महात्म्याचा अभ्यास करतात .

अनेक राज्यात भ्रमण केले लोकांनी त्याला जगवलं - प्रदीप कुमार ऑक्टोबर 2021 ला घरच्यांचा विरोध पत्करून देश भ्रमण करायला निघालाय. आपली एक सायकल घेऊन तो हजारो किलोमीटर उत्तर प्रदेश ,बिहार, झारखंड, ओडिषा, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक ,तामिळनाडू, केरळ , गोवा, कोकण मार्गे पश्चिम महाराष्ट्र प्रवास करत नाशकामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि 11 महिन्याने तो बरोबर महाराष्ट्रात आला. काल तो मुंबईत आला. दररोज 80 ते 100 किलोमीटर इतके अंतर तो सायकलने कापतो आणि जिथे कुठे मंदिर ,मशीद ,चर्च दिसेल त्या ठिकाणी थांबतो. कोणी दिले दोन घास तर खातो आणि एक रोपटे तो प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी लावतो. त्याचं हे वागणं पाहून जनता भारावते.

फिरता फिरता नक्षलवादी इलाख्यात सापडला - त्याच्या भटकंती बद्दल त्याच्याशी बोलले असता त्याने सांगितलं की," मला पर्यावरणाबद्दल खूप अप्रूप आहे .एकदा अशी घटना घडली की, बिहार मी सोडलं आणि बंटीया घनदाट जंगलात घुसलो. मला रस्ता फारसा माहीत नव्हता. तो रस्ता सरळ नक्षलवाद्यांच्या बाले किल्ल्यात पोहोचला. मला माहित नाही की तिथे कोण आहेत आणि ते काय करतात .परंतु त्यांच्या किल्ल्यात गेल्यामुळे त्यांनी माझ्या मानेवर बंदूक ठेवली माझी चौकशी केली. मात्र त्यातल्या अनेकांना माझा मुद्दा पटला आणि त्यांनी मला चौकशी करून मदत करून प्रवासाला शुभेच्छा दिल्या." असे त्याने ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले.

एक लाख झाडं तो लावणार- अशा अनेक अवघड प्रसंगातून प्रदीप कुमार यादव हा अनुभवाचे गाठोड सोबत घेत आपली दिशा पक्की करत मार्गावर चालतच राहतो. पोन्डेचरी राज्यात गेल्यावर तिथे सायकल आणि त्याचा मोबाईल चोरीला गेला. त्यानंतर जनतेने मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बातमी दिली आणि मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्या हस्ते त्याचा सत्कारही केला. त्याला नवीन सायकल मोबाईलही भेट दिला. त्याच्या या सगळ्या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे, तो ज्या गावात जातो तिथून चार रोपटे घेतो आणि पुढील ठिकाणी ते रोपटे तो लावतो. मंदिर असो किंवा सार्वजनिक रुग्णालय असो किंवा शाळा असो अशा ठिकाणी तो रोपटे लावतो. कुठून तरी पाणी आणतो मग लोक त्याची विचारपूस करतात. मग लोकांसोबत त्याची दोस्ती तयार होते. दररोज किमान तो दहा पंधरा वीस रोपटे लावत तिथल्या लोकांना ते रोपटे जपण्याचा सल्ला देतो. त्याला एक लाख झाडं लावायची आहे, असा त्याचा संकल्प आहे. आतापर्यंत त्याने हजारो झाड लावलेली आहे. अजून चार महिने तो संपूर्ण भारतभर देशाटन करणार आहे . त्यानंतर तो आपल्या घरी परतणार असल्याचा त्याने आपल्या मनोगतात म्हटले.आता पर्यंत त्याला कोणताही खर्च लागला नाही. लोकच त्याला मदत करतात. आत तो गुजरातच्या मार्गावर निघालाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.