मुंबई - सायन येथील एका ३० वर्षीय तरुणाला महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक ( Hacking WhatsApp ) करून तिच्या मित्रांना अश्लील व्हिडिओ पाठवून त्याला भेटण्यासाठी ब्लॅकमेल ( Blackmail by sending pornographic videos ) केल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. रवी दांडू असे आरोपींचे नाव असून तो खासगी बँकेत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे.
अंधेरी पोलिसांकडून मिळाल्या माहितीनुसार - आरोपीने बँकेच्या खातेदारांच्या यादीतून विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक मिळवला होता. विलेपार्ले येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या पिडीत मुलीला 20 जानेवारी रोजी आरोपीचा फोन आला. त्याने स्वतःला विद्यार्थी आल्याचे सांगत तो विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवत आहे, जेणेकरुन नोट्स आणि इतर अभ्यास सामग्रीची देवाणघेवाण करण्यासाठी या ग्रुपमध्ये ॲड होण्याचा तगादा लावला होता. मुलीने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होण्यास सहमती दिली. आरोपीने मुलीला एक लिंक पाठवली आणि तिला तिच्या फोनवर प्राप्त होणारा ओटीपी सांगणास सांगितले. ओटीपी दिल्यानंतर, आरोपीने तिचे व्हॉट्सॲप अकाउंट ऍक्सेस करून फ्रेंड सर्कलमधील किमान 35 व्यक्तीना अश्लील व्हिडिओ पाठवले. तिचे फोटो मॉर्फ करून व्हिडिओमध्ये वापरले.व एकांतात भेटण्यासाठी पिडीत मुलीला ब्लॅकमेल केले.
पोस्को आणि आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल - फेब्रुवारीमध्ये अंधेरी येथे राहणाऱ्या एका मुलीने तिच्या आई-वडिलांसह पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. आरोपीचा ज्या फोन नंबरवरून पीडितेला कॉल केला होता. त्या कॉलची पोलिसांनी माहिती काढली.व बुधवारी ( 20 जुलै ) रात्री उशिरा मुकुंद नगर सायन येथील राहत्या घरातून आरोपीला अटक केले. आरोपीने कबूल केले की त्याने ते व्हिडिओ मुलींना पाठवले होते. परंतु त्यापैकी कोणाला प्रत्यक्ष भेटला नसल्याचे सांगितले.तर आरोपीवर पोस्को आणि आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस आता व्हिडिओ मिळालेल्या मुलींशी संपर्क साधत आहेत. की त्यांच्यापैकी कोणाला आरोपीला भेटायला भाग पाडले गेले होते का याचा तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा : Bombay High Court : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीची कोर्टात धाव.. एनआयएचा विरोध