ETV Bharat / city

महापौर बंगल्यावर 'योग डे' साजरा - आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष

21 जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योग दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आपल्या शासकीय महापौर बंगल्यावर कर्मचाऱ्यांसह यागासने केले.

महापौर बंगल्यावर 'योग डे' साजरा
महापौर बंगल्यावर 'योग डे' साजरा
author img

By

Published : Jun 21, 2021, 11:02 AM IST

मुंबई - आज देशभरात योगा दिन साजरा केला जात आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आपल्या शासकीय महापौर बंगल्यावर योगा डे साजरा केला. यात महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह बंगल्यावरील कर्मचारी सहभागी झाले होते.

महापौर बंगल्यावर 'योग डे' साजरा

जगभरात 300 दशलक्ष लोक योगासने करतात

21 जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो. सन 2015 पासूनच, जागतिक स्तरावर उत्सव साजरा करण्यास सुरवात केली गेली. चांगल्या आरोग्यासाठी योग करणे खूप महत्वाचे आहे. योग हा शब्द संस्कृतमधील आहे. योगाचा इतिहास हा हजारो वर्ष जुना असल्याचे म्हटले जाते. शारीरिक व मानसिक विकारांचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय योग फेडरेशनच्या माहितीनुसार सध्या जगभरात 300 दशलक्ष लोक योगाभ्यास किंवा योगासने करतात.

21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा

27 सप्टेंबर 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना मांडली. योग हा केवळ एक व्यायामप्रकार नसून, आपल्या 'स्व'चा शोध घेण्याचा, मनःशांती प्राप्त करण्याचा आणि मानसिक व शारिरीक संतुलन राखण्याचा एक मार्ग आहे, असे ते म्हणाले होते. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. ज्यामध्ये सुमारे 36,000 लोकांनी भाग घेतला होता. याव्यतिरिक्त, सुमारे 84 देशांच्या प्रतिनिधींनी 21 योगाचे आसन केले. 2015 पासून दरवर्षी योग दिन साजरा केला जातो.

21 जून इतर दिवसांपेक्षा मोठा दिवस

पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. 21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.

हेही वाचा - International Yoga Day 2021 : जाणून घ्या 21 जूनलाच का साजरा केला जातो योग दिवस!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.