मुंबई - हजारो कोटी रुपयांचे कर्ज देऊन त्याचा परतावा न झाल्याने आर्थिक संकटात आलेल्या येस बँकेमध्ये एसबीआय, एचडीएफसी , आयसीआयसीआय व अॅक्सिस बँकेसाराख्या 9 संस्थांनी येस बँकेत मोठी गुंतवणूक केल्या कारणाने येस बँकेच्या ग्राहकांवरील आर्थिक निर्बंध बुधवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून उठविण्यात येणार आहेत. बँकेच्या प्रशासनाकडून त्या प्रकारची घोषणा करण्यात आली आहे.
येस बँकेच्या देशभरात असलेल्या 1132 शाखांमधील बँक ग्राहकांना आता बँकेकडून देण्यात येणाऱ्या डिजिटल व सर्व स्तरावरील सेवा पुन्हा बहाल करण्यात आल्या आहेत, बँकेच्या देशभरातील एटीएम सेंटरमध्ये मुबलक रोख रक्कम ठेवण्यात आल्याचेही बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेत एसबीआय बँकेने 49 टक्के गुंतवणूक केली असून , आयसीआयसीआय बँक व एचडीएफसी बँकेने 1000 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या बरोबरच अॅक्ससिस बँकेने 600 कोटी रुपये , कोटक महिंद्रा बँकेने 500 कोटी तर बंधन बँक व फेडरल बँकेने प्रत्येकी 300 कोटी याच्यासह आयडीएफसी बँकेने 250 कोटींची गुंतवणूक केली आहे. आरबीआय कडून येस बँक ग्राहकांवर 3 एप्रिल पर्यंत 50 हजार रुपये काढण्याची मर्यादा आणल्यानंतर येस बँकेवर प्रशासक म्हणून एसबीआय बँकेचे माजी एमडी प्रशांत कुमार यांची निवड केली आहे.