ETV Bharat / city

वर्षाअखेरीस पूर्ण होणार ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम

author img

By

Published : Jul 2, 2021, 8:06 PM IST

मुंबईतील रेल्वे विकास प्रकल्पासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-2 (एमयूटीपी)मध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रकल्पांमध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. मात्र, त्यात अडथळे येत गेल्याने अजूनही हा प्रकल्प रखडत होता. मात्र, आता ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिकेचे काम सुरू आहे.

मुंबई लोकल
मुंबई लोकल

मुंबई - मुंबईच्या लोकल सेवेला गती मिळावी म्हणून ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला होता. मात्र, मागील १३ वर्षांपासून या प्रकल्पाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने प्रकल्पाची गती कमी होत आहे. तरी, यावर मात करून ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम वर्षाअखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे.

कळवा-मुंब्रा उन्नत मार्गाचे काम सुरू

मुंबईतील रेल्वे विकास प्रकल्पासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-2 (एमयूटीपी)मध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रकल्पांमध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. मात्र, त्यात अडथळे येत गेल्याने अजूनही हा प्रकल्प रखडत होता. मात्र, आता ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकल्पांना २००८साली मंजुरी मिळाली. मात्र निधी, जागेचे नियोजन, नागरिकांचे पुनर्वसन अशा अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडला. तर, प्रकल्पांच्या कामांनी मार्च २०२१मध्ये वेग धरला होता. मात्र, कोरोनामुळे मनुष्यबळाची कमतरता, कडक निर्बंध, गर्डर व इतर धातूची सामग्रीची कटिंग करण्यासाठी ऑक्सिजनची कमतरता जाणवल्याने कामांचा वेग मंदावला होता. मात्र, या प्रकल्पातील मुंब्रा ते कळवा १. ४० किमी उन्नत मार्गिकेच्या कामाच्या ठिकाणी ट्रॅक टाकण्याचे काम आता सुरू आहे. हे काम जुलै महिन्यात पूर्ण करण्याची तयारी एमआरव्हीसीकडून केली जात आहे.

५०२ कोटी रुपये खर्च

हा मार्ग सुमारे ९.८ किमीचा असून २०१९पर्यंत ही मार्गिका पूर्ण होणार होता मात्र, आता २०२०-२१पर्यंतही मार्गिका पूर्ण होणार, असा दावा करण्यात आला आहे. यामार्गिकेमुळे मेल/एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका मिळणार असल्याने लोकल वाहतुकीतील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. याप्रकल्पाची अगोदरची डेडलाइन डिसेंबर २०१७ची होती. पण त्यास विविध कारणांनी विलंब झाला आहे. दरम्यान, ठाणे ते दिव्यातील पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर या पट्ट्यात सुमारे जादा १०० फेऱ्या चालविल्या जाउ शकतात, असा अंदाज आहे. या ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च १४० कोटी रुपये होता. मात्र प्रकल्प रखडल्याने सुमारे ५०२ कोटी रुपये खर्च लागला आहे.

प्रकल्पाचे वैशिष्ट्य

सध्या कुर्ला ते ठाणे आणि दिवा ते कल्याण दरम्यान पाचवा-सहावा मार्ग कार्यरत आहे. ठाणे ते दिवा दरम्यान पाचवा आणि सहावा रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यास उपनगरीय रेल्वे आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक वेगवेगळ्या रेल्वे ट्रॅकवरून करणे सोयीचे होणार आहे. ठाणे ते दिवा दरम्यान टाकण्यात येत असलेला पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग हा ठाणे ते दिवा दरम्यानच्या धिम्या मार्गाला जोडून आले. हा मार्ग नंतर जलद गाड्यांसाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पातील मुंब्राजवळ दीड किलोमीटरचा उन्नत मार्ग, रुळांसह अन्य तांत्रिक कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे,

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.