मुंबई - राज्यात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा राज्याच्या महिला आणि (Adv. Yashomati Thakur)बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. (Beating a Pregnant Woman) सातारा येथील वनकर्मचारी महिलेला झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सातारा जिल्ह्यातील परसोडी गावाच्या माजी सरपंचाने एका महिला वनरक्षकाला व त्याच्या पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. (Beating a Pregnant Woman On Adv. Yashomati Thakur) त्यावर प्रतिक्रिया देताना ठाकूर बोलत होत्या.
महिलांनी धीट होणे गरजेचे आहे
धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला तीन महिन्यांची गर्भवती देखील होती. पोटात लाथा दगड मारल्या गेल्याने ती रक्तबंबाळ झाली आहे. दरम्यान, या घटनेचा महाराष्ट्रात महिलांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही या संदर्भात कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनी धीट होणे गरजेचे आहे. महिलांनी आक्रमक झाल्याशिवाय त्यांना शिक्षा होणार नाही अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली आहे. तसेच, कोणी जर महिलांवर अत्याचार करत असेल तर ते सहन खपून घेणार घेतले जाणार नाही असा इशाराही मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
यावेळी वनरक्षक पतीसही मारहाण झाली आहे
प्राणी गणणेसाठी वनमजुर महिलांना घेऊन गेल्याच्या रागातून चार महिन्यांच्या गरोदर वनरक्षक महिलेस पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार पळसावडे (ता. सातारा) येथे घडला. यावेळी वनरक्षक पतीसही मारहाण झाली आहे. याप्रकरणी पळसावडे येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्ष रामचंद्र गंगाराम जानकर व त्याच्या पत्नीवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चप्पल, काठी व दगडाने मारहाण केली
रामचंद्र जानकर व प्रतिभा जानकर (दोघेही रा. पळसावडे) अशी संशयितांची नावं आहेत. रामचंद्र जानकर हा माजी सरपंच आहे. सिंधू बाजीराव सानप (वय 24, रा. गोवर्धन कॉलनी दिव्यनगरी) व त्यांचे पती वनरक्षक सुर्याजी ठोंबरे यांना कर्तव्यावर असताना या दोघांनी शिविगाळ, दमदाटी करत हाताने, चप्पल, काठी व दगडाने मारहाण केली.
तुला जीवंत सोडणार नाही -
सिंधू सानप या पळसावडे तर व त्यांचे पती सुर्याजी ठोंबरे हे खडगाव बीटमध्ये वनरक्षक म्हणून सेवेत आहेत. काल (बुधवारी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वनरक्षक दाम्पत्य वनमजुराला घेऊन पळसावडे वनक्षेत्रात प्राणी गणणेसाठी गेले होते. त्यावेळी प्रतिभा व रामचंद्र जानकर तेथे आले. प्रतिभा जानकर हिने सुर्याजी ठोंबरे यांना चप्पलीने मारहाण सुरु केली. रामचंद्र जानकर यांनीही शिवीगाळ करत मारहाण केली. सिंधू सानप यांना खाली पाडून हाताने, लाथाबुक्यांनी, दांडक्याने मारहाण करण्यात आली. रामचंद्र जानकर याने वनरक्षक महिलेच्या केसांना धरुन 'तुला जीवंत सोडणार नाही' असे म्हणुन त्यांचे दगडावर डोके आपटले.
हेही वाचा - Amar Jawan Jyoti : 'अमर जवान ज्योती' आता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर