मुंबई - मुंबईतील क्रांतीनगर भागात एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. दिपक सांगळे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही हत्या दिपक याची पत्नी, तीचा भाऊ आणि इतर काही जणांच्या मदतीने झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेशी संबंधीत सर्वांना अटक केली आहे.
काय घडला प्रकार?
(21 जुन 2021)रोजी दिपक सांगळे बेपत्ता असल्याची माहिती दिपकची बहिण संगीता सांगळे यांनी येथील विनोबा भावे पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यानंतर या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. संगीता सांगळे यांनी दिलेल्या तक्रारीत दिपक हा 15 जून 2021 पासून बेपत्ता असल्याचे नमूद केलेले होते. दिपक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. दिपकवर काही गुन्ह्यांची नोंद होती. त्यामुळे त्याचे गायब होणे संशयास्पद असल्याचे पोलिसांना लक्षात आले. दरम्यान, पोलीस दिपकच्या कुटुंबावरही पाळत ठेवून होते.
जेवनामध्ये औषध घातले
दिपकच्या बहीणीने दिपकच्या पत्नीवर तसेच मेहुण्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी मेहुण्याला चौकशीसाठी बोलावले. त्यामध्ये त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. दिपकच्या जेवणामध्ये औषध घातले. त्यानंतर दिपक झोपला. दरम्यान, पत्नीने आणि मेव्हण्यासह अन्य दोघांनी त्याची हत्या केली असे पोलिस तपासात समोर आले आहे. हत्या केल्यानंतर पुरावा लपवण्यासाठी दिपकचा मृतदेह घरातच पुरण्यात आला. या प्रकरणात एकूण सात संशयितांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.