ETV Bharat / city

'ती' तर अफवाच, उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतूर -  नवाब मलिक - नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजप प्रवेश करणार असल्याची अफवा समाजमाध्यमातून समोर येत होती. मात्र, नवाब मलिक यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

Nawab malik news
Nawab malik news
author img

By

Published : Aug 10, 2020, 12:39 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार, अशी अफवा विरोधक पसरवत आहेत. मात्र, ही खोटी व निव्वळ अफवा आहे. विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मलिक म्हणाले विरोधकांकडून आमचे आमदार जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. आमचे आमदार जाण्याऐवजी निवडणुकीच्या अगोदर भाजपात गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत यायला आतुर झाले आहेत. परंतु, यावर कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र, यावर लवकरच निर्णय होवून त्याची माहिती दिली जाईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.