मुंबई - कार्डिलिया क्रूज पार्टीचा आयोजक काशिफ खान (Kashif Khan) याच्या विरोधात पुरावे असूनही त्याला अटक केली जात नाही. काशीफ खान आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे काय संबंध आहेत? असा सवाल पुन्हा एकदा राज्यातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उपस्थित केले आहेत. WhatsApp चॅट्स हाती लागले असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
'काशीद खान याला का पकडण्यात आले नाही?'
ड्रग्स प्रकरणांमध्ये नव्याने काही खुलासा करण्यासंदर्भात नवाब मलिक यांनी आज ट्विट केले होते. त्यानंतर आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले असून एनसीबी ने केलेल्या कारवाईवर त्यांनी बोट ठेवले आहे. आपल्याला के. पी. गोसावी आणि दिल्लीतील एक खबरी यांच्यातील WhatsApp चॅट्स हाती लागले असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. या चॅटमध्ये व्हाईट दुबे (White Dube) नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे. दिल्लीच्या खबरीने के. पी. गोसावी कडून का शिक्षकांचा फोटो मागवला. मग इतर आरोपींना फोटो बघून ज्या प्रकारे पकडण्यात आले त्या प्रकारे काशीद खान याला का पकडण्यात आले नाही? एनसीबीने पार्टीमध्ये एवढी मोठी कारवाई करूनही आयोजकाला का ताब्यात घेतले नाही? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
-
Re- posting the whatsapp chats between K P Gosavi and an informer for those doubting the authenticity of the same.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
K P Gosavi's number is visible here and open to verification, he is currently in the custody of Pune Police. pic.twitter.com/wScPGk4jiE
">Re- posting the whatsapp chats between K P Gosavi and an informer for those doubting the authenticity of the same.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
K P Gosavi's number is visible here and open to verification, he is currently in the custody of Pune Police. pic.twitter.com/wScPGk4jiERe- posting the whatsapp chats between K P Gosavi and an informer for those doubting the authenticity of the same.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
K P Gosavi's number is visible here and open to verification, he is currently in the custody of Pune Police. pic.twitter.com/wScPGk4jiE
'एनसीबीची गोव्यात कारवाई का नाही?'
क्रूज पार्टीचा आयोजक काशिफ खान गोव्यात लपलेला आहे. समीर वानखेडे यांच्याकडे गोव्याचे अधिकार देखील होते. गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यापार चालतो. मात्र तरीही गोव्यामध्ये कोणतीच मोठी कारवाई केली जात नाही. काशिफ खान हादेखील ड्रग्ज रॅकेट गोव्यातून चालवतो. असे असताना काशिफ खान याची चौकशी का केली जात नाही. तसेच चॅटमध्ये उल्लेख असलेला व्हाईट दुबे याला अटकेसाठी कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे नवाब मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले.
हेही वाचा - ड्रग्ज प्रकरणी एसआयटी आता केवळ तीनच प्रकरणांची करणार चौकशी; तर तीन प्रकरण वगळली