ETV Bharat / city

Andheri East Assembly Constituency election:अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघावर कुणाचा झेंडा फडकणार? - Rutuja Latke

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (Late MLA Ramesh Latke) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा जागेवर पोटनिवडणूक (Andheri East Assembly Constituency election) होते आहे. ३ नोव्हेंबरला होणाऱ्या या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत जाणून घेऊया या मतदारसंघाचे अंतरंग.

Andheri East Assembly Constituency election
अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघावर कुणाचा झेंडा फडकणार
author img

By

Published : Oct 3, 2022, 8:07 PM IST

मुंबई: शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (Late MLA Ramesh Latke) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघावर (Andheri East Assembly Constituency election) आता कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण, हा मतदारसंघ राज्यातील आगामी निवडणुकांची पूर्व चाचणी ठरणार आहे. एकीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि भाजपा एकत्र झाल्याने ही चुरस पाहायला मिळणार आहे. कोणाच्याही निधनाने रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीत शक्यतो उमेदवार द्यायचा नाही हे काँग्रेस राष्ट्रवादीचे धोरण असल्याने त्यांची मदत आपसूकच शिवसेना ठाकरे गटाला होणार आहे.

शिवसेनेचाच वरचष्मा हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, त्यानंतर शिवसेनेने आपली पाळेमुळे या मतदार संघात पसरवली. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांनी सलग दोन वेळा विजय संपादन केला. पहिल्या टर्ममध्ये त्यांनी तत्कालीन काँग्रेसचे आमदार आणि मंत्री सुरेश शेट्टी यांचा पराभव केला तर दुसऱ्या टर्ममध्ये भाजपाचे बंडखोर मुरजी पटेल यांना धूळ चारत विजय संपादन केला होता. आता या मतदारसंघावर आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपच्या वतीने पुन्हा एकदा मुरजी पटेल (Murji Patel BJP) यांना तिकीट दिले जाणार आहे. त्यांच्या विरोधात रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rituja Latke) शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवण्यास उभ्या आहेत. मात्र शिंदे गट आणि भाजपा एकत्र झाल्याने यावेळी शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची आणि आगामी निवडणुकांची दिशा ठरवणारी असणार आहे.

अशी आहे मतदार संघाची रचना अंधेरी पूर्व हा मतदार संघ अंधेरी पूर्वेकडील काही नगरे जोगेश्वरी आणि विलेपार्लेचा काही परिसर असा मिळून अंधेरी पूर्व मतदार संघ करण्यात आला आहे. या मतदारसंघात अंधेरीतील पाच प्रभाग आणि जोगेश्वरीतील दोन व विलेपार्ले येथील अंशतः तीन प्रभाग येतात. या मतदारसंघात साकीनाका ते महाकाली गुंफा परिसर, अंधेरी एमआयडीसी, वीर नेताजी पालकर चौक, गुंदवली, भवानीनगर, विजयनगर लार्सन अँड टुब्रो पावर कॉम्प्लेक्स, पवईचा काही भाग अंधेरी कुर्ला रोड पश्चिम द्रुतगती महामार्गालगतचा भाग या मतदारसंघात आहे.

मतदार संघाची मतदार संख्या, भाषिक रचना? या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 2 लाख 71 हजार 668 इतकी आहे. यापैकी पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 46 हजार 780 तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 24 हजार 887 इतकी आहे. एका तृतीयपंथी मतदाराचा समावेश या मतदारसंघात होतो. या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि मराठी भाषिक मतदारांचे (North Indian and Marathi speaking voters) समसमान प्रमाण आहे. त्या पाठोपाठ मारवाडी, गुजराती आणि जैन समाजाचे लोक या मतदारसंघात आढळतात.

काय आहेत मतदारसंघातील अडचणी ? प्रभागानूसार पाहायचे झाल्यास वॉर्ड क्रमांक ८० मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची (एसआरए) (Slum Rehabilitation Scheme) मोठी समस्या आहे. येथील रहिवासी दहा-बारा वर्षे घरापासून वंचित आहेत. वॉर्ड क्रमांक १२१, ७६, ८१ मध्ये रस्त्यांची खूप दुर्दशा झालेली आहे. वॉर्ड क्रमांक ७५ म्हणजे कृष्ण नगरमधील मोठा नाला साफ होत नसल्यामुळे तेथील सर्व नाले पावसाळ्यात तुडुंब भारतात. परिणामी या नाल्याचे पाणी बाहेर आल्याने मरोळ परिसर जलमय होतो. त्याचबरोबर कदमवाडीतील रोड रुंदीकरण विकास योजना दहा वर्षांपूर्वीच मंजूर होऊन अद्याप त्यासंदर्भात पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे तिथून एकावेळी एकच गाडी ये-जा करू शकते आणि त्यामुळे प्रचंड वाहतुककोंडी होत असते.वाहतुकीची मोठी कोंडी, दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण, अनेक झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सेवासुविधांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, पावसाळ्यात सखल भागात तुंबणारे पाणी, आरोग्याचा प्रश्न, सांडपाण्याचा निचरा या प्रमुख नागरी समस्या स्थानिकांना भेडसावतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.