ETV Bharat / city

जे काही होईल ते कोर्टात समोर येईल, माझ्यावर दबाव टाकला जात आहे - समीर वानखेडे - sameer khan gets bail

जे काही होईल ते कोर्टात समोर येईल, याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. माझ्यावर दबाव टाकला जात आहे, अशी प्रतिक्रिया एनसीबीचे पश्चिम विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांनी दिली आहे.

समीर वानखडे
समीर वानखडे
author img

By

Published : Oct 14, 2021, 2:49 PM IST

Updated : Oct 14, 2021, 3:13 PM IST

मुंबई - कार्डीला क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीमध्ये सहभागी झाल्याने एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलिवूड स्टार आर्यन खान याला अटक केली आहे. आर्यन खान आणि समीर खानप्रकरणी एनसीबीच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर जे काही होईल ते कोर्टासमोर येईल, माझ्यावर दबाव टाकला जात आहे, अशी प्रतिक्रिया एनसीबीचे पश्चिम विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांनी दिली आहे.

माझ्यावर दबाव टाकला जात आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या जावयाला एनसीबीने फसवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर एनसीबी कार्यालयाखाली पत्रकारांशी बोलताना ही समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे काही होईल ते कोर्टात समोर येईल, याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. करण सजनानी याला समीर खान याने आर्थिक मदत केली होती. करण सजनानीकडे जे सॅम्पल मिळाले त्यातील 18 पैकी 11 सॅम्पलमध्ये गांजा आढळून आलेला नाही. इतर सॅम्पलमध्ये गांजा आढळून आला आहे. कोर्टात जो रिपोर्ट दिला आहे तो वाचून घ्या असे सांगत माझ्यावर दबाव टाकला जात आहे अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली आहे.

हेही वाचा - अभिनेत्री नोरा फतेही 'ईडी' कार्यालयात दाखल, जॅकलीन फर्नांडिस उद्या लावणार हजेरी

Last Updated : Oct 14, 2021, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.