ETV Bharat / city

MH leaders Ayodhya Visit : पक्षांच्या अयोध्यावारीचा मतदारांवर प्रभाव नाही- राजकीय विश्लेषकांचे मत

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी नवनवीन योजना आखायला सुरुवात केली आहे. त्यानुसार ओबीसी आरक्षण आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या निवडणुकांमध्ये मतदारांना ( Ayodhya visit for vote bank ) आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विकासाचे मुद्दे महागाईची झळ इंधनाच्या वाढलेल्या किमती याबाबत बोलायला फारसे कुणी ( issue of OBC reservation and Hindutva ) उत्सुक असल्याचे दिसत नाही.

author img

By

Published : May 10, 2022, 5:36 PM IST

Updated : May 10, 2022, 6:38 PM IST

अयोध्या दौरा
अयोध्या दौरा

मुंबई - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असली हिंदुत्व आणि नकली हिंदुत्व दाखवण्याची ( fake vs real Hindutva ) स्पर्धा राजकीय पक्षांमध्ये ( Political parties coemption on Hindutva ) लागली आहे. मात्र राजकीय पक्षांच्या या अयोध्य वारीचा महाराष्ट्रातल्या मतदारांवर फारसा प्रभाव पडणार नाही, असे मत जाणकार व राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी नवनवीन योजना आखायला सुरुवात केली आहे. त्यानुसार ओबीसी आरक्षण आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या निवडणुकांमध्ये मतदारांना ( Ayodhya visit for vote bank ) आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विकासाचे मुद्दे महागाईची झळ इंधनाच्या वाढलेल्या किमती याबाबत बोलायला फारसे कुणी ( issue of OBC reservation and Hindutva ) उत्सुक असल्याचे दिसत नाही.

पक्षांच्या अयोध्यावारीचा मतदारांवर प्रभाव नाही

हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न-राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचे राजकारण सुरू केल्यानंतर त्या पाठोपाठ अयोध्या वारी करून श्रीरामाचे दर्शन घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर आपण हिंदू मतदारांना आकर्षित करू, असा त्यांना विश्वास वाटतो आहे. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही अयोध्या दौरा करणार असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. काँग्रेसही आता हिंदुत्वाच्या वाटेवर मतदारांसाठी चालणार का? हा नवा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. या संदर्भात जाणकारांना मात्र राजकीय पक्षांच्या या अयोध्या वारीचा मतदारांवर तितकासा परिणाम होणार नाही, असे वाटते.

ही राजकीय पक्षांची दार्शनीक कृती - जोशी- राजकीय पक्ष हे अयोध्येत जाऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी रामाचे दर्शन घेणार आहेत. वास्तविक राजकीय पक्षांची ही दार्शनीक कृती आहे. ही कृती मतदारांना फारशी आकर्षित करणारी नाही. कारण अयोध्येच्या लढाईमध्ये भाजपाचा असलेला वाटा आणि अन्य पक्षांचा असलेला सहभाग हे मतदारांना चांगले माहित आहे. त्यामुळे अयोध्येत जाऊन कोणत्याही पक्षाचे हिंदुत्व सिद्ध होईल आणि त्यामुळे मतदार त्यांच्या पाठीमागे उभी राहतील, अशी आज तरी परिस्थिती नाही. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केली आहे.

रामासाठी नव्हे यांची मतदारांसाठी अयोध्येत धाव - मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी सर्व करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. यासाठी मुंबईत मित्र पक्ष म्हणून भाजप मनसेकडे पाहत आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांची हिंदी भाषिकांमध्ये असलेली प्रतिमा सुधारण्यासाठी राज यांचा अयोध्या दौरा हा भाजप पुरस्कृतच आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे यांनी व्यक्त केली आहे. यापैकी एकाही राजकीय पक्षाला अयोध्येत जाऊन रामाचे मनोभावे दर्शन घ्यायचे नाही. तर केवळ मुंबईत असलेल्या हिंदी भाषिक मतदारांमध्ये आपली प्रतिमा सुधारून त्यांची मते मिळवण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचे शिरवाळे म्हणाले.

हेही वाचा-MNS Bala Nandgaonkar : 'भाजपाचा युपीतील एक खासदार म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश नाही'

हेही वाचा-MNS Leader Vasant More : ...तोपर्यंत पक्ष कार्यालयात जाणार नाही; वसंत मोरे यांचा निर्धार

हेही वाचा-Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह आक्रमक! राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध कायम

Last Updated : May 10, 2022, 6:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.