मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिवसा जमावबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनची सुरुवात मुंबईत झाली आहे. पुढील दोन दिवस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी घराबाहेर पडावे, इतरांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन
दरम्यान नागरिकांनीही वैद्यकीय कामाशिवाय बाहेर पडू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना आपल्याला मोबाईलवर आलेला संदेश दाखवून, लसीकरण केंद्रापर्यंत जात येणार आहे. लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ट्रेन, बस, रिक्षा आणि टॅक्सी सुरू राहणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण होईपर्यंत कोरोनाच्या आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगावा लागणार आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेयकुमार जाधव यांनी.