मुंबई - अँटिलिया कार स्फोटक प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सचिन वाझे यांचे पाय आणखीनच खोलात जात आहेत. वाझे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझे यांच्याकडे एक बनावट आधार कार्ड असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याच आधार कार्डाच्या मदतीने सचिन वाझे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होते. त्याचबरोबर एनआयएच्या हाती या हॉटेलमधील एक सीसीटीव्ही फुटेज देखील लागलेले आहे.
यामध्ये सचिन वाझे हे पाच बॅग घेऊन जात असताना दिसत आहेत. एनआयएला मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला देखील दिसत आहे. या महिलेच्या हातामध्ये नोटा मोजण्याचे मशीन आहे. ही महिला नेमकी कोण आहे? या महिलेचा नेमका या प्रकरणाशी संबंध काय? वाझेंच्या हातामध्ये असणाऱ्या बॅगांमध्ये नेमकं होतं काय? याचा शोध सध्या एनआयए घेत आहे.