मुंबई - अंटिलिया स्फोटक प्रकरणात रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे. तपासादरम्यान काही तथ्य, पुरावे काही दस्तऐवज, गाड्या आणि चौकशा यांच्या जोरावर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. नियमानुसार वाझे यांचे निलंबनही झालं. मात्र या प्रकरणात वाझे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली किंबहुना मलीन झाली आहे.
मलीन प्रतिमा विषयी स्वतः मुंबई पोलीस दलाचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः सांगितलं आहेच. मात्र या प्रकरणात मुकेश अंबानी यांच्याकडून मोठी खंडणी उकळण्याचे षड्यंत्र होते, असा दावा जेष्ठ पत्रकार बालकृष्ण यांनी केला आहे.
काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार एस. बालकृष्ण ?
वाझे प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. ही प्रतिमा सुधारण्यास मुंबई पोलीस दलाचे नवे आयुक्त हेमंत नगरळे यांना बराच वेळ लागणार आहे. या पोलीस दलाला काही पोलीस अधिकारी आणि आयपीएस अधिकारी एका बिजनेस कंपनीप्रमाणे चालवत आहे. सर्वांचा एकसूत्री कार्यक्रम आहे तो म्हणजे पैसे कमावणे. हे पैसे कमवण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जातात. कायद्याचे उल्लंघन करतात, कायदा तोडतात-मोडतात. वाझेचं प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणात वाझेंनी पोलीस दलाचाच गुन्ह्यात वापर केला. वाझेंच्या पाठीवर बड्या आयपीएस अधिकाऱ्यांचा आणि राजकीय मंडळींचा वरदहस्त आहे. याशिवाय वाझे मुकेश अंबानी यांना टार्गेट करूच शकत नाहीत. यांचा प्लान हा मुकेश अंबानी यांच्याकडून 1 हजार, दोन हजार, तीन हजार कोटींची खंडणी गोळा करणे हो होता.
हे ही वाचा - महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; ऊर्जा खाते राऊतांकडून जाणार?
हे ही वाचा - 'आयुर्वेदिक रुद्राक्ष' ; परिधानानंतर 'या' व्यादींपासून मिळते मुक्ती