मुंबई - मुंबई महानगरपालिकेतील वैद्यकीय शिक्षकांच्या निवृत्तीचे वय ६२पेक्षा जास्त वय वाढवू नये, यासाठी महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने आपले निवेदन आयुक्तांना सादर केले आहे. यानंतर आयुक्त इक्बाल चहल यांनी संघटनेला अश्वस्त करत कोणत्याप्रकारे सेवा निवृत्तीचे वय वाढवले जाणार हे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर संघटनेकडून असे सुचवण्यात आले आहे, की जे ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहे. त्यांच्या अनुभवाचा वापर करणाऱ्यांसाठी आपण त्यांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र जर निवृत्तीचे वय वाढवले तर आमरण उपोषण आणि सामूहिक राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा - कोल्हापुरात १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण लांबणीवर; केवळ ज्येष्ठ नागरिकांचे होणार लसीकरण