ETV Bharat / city

Mumbai : वरळी-शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाबाधितांनी घेतली राज ठाकरेंची भेट

author img

By

Published : Mar 19, 2022, 7:59 PM IST

वरळी-शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक ( Warli Shivdi Nhavasheva transharbour link ) रोड प्रकल्पात अनेकांची घरे आणि दुकान जाणार आहोत. त्यामुळे या प्रकल्पाबाधितांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

Raj Thackeray
Raj Thackeray

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( MMRDA) कडून बांधण्यात येणाऱ्या वरळी-शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक ( Warli Shivdi Nhavasheva transharbour link ) रोड प्रकल्पात अनेकांची घरे आणि दुकान जाणार आहोत. त्यामुळे या प्रकल्पाबाधितांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई देखील उपस्थित होते.

स्थानिकांच्या व्यथा

इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे की, "आम्हाला अद्यापही या प्रकल्पाबाबत कोणतीही पूर्वकल्पना अथवा नोटीस देण्यात आलेली नाही. आम्ही मागच्या 100 हून अधिक वर्षापासून इथं राहतो आहे. त्यामुळे आमचं पुनर्वसनदेखील इथल्या आजूबाजूच्या परिसरात व्हायला हवं, अशी स्थानिकांची मागणी आहे.

सर्व कुटुंब मराठी

या संदर्भात बोलताना मनसेचे नेते नितीन सरदेसाई म्हणाले की, 'शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक रोड प्रकल्प आता सरकारने हाती घेतला आहे. या प्रकल्पात शिवडी व एलफिस्टन परिसरातील काही इमारती बाधित होत आहेत. हा परिसरच मराठीबहूल असल्याने इथली प्रकल्पबाधित कुटुंब देखील मराठीच आहेत.'

राज ठाकरे घेणार अधिकाऱ्यांसोबत बैठक -

सरदेसाई पुढे म्हणाले की, 'या रहिवाशांनी प्रशासनासमोर तीन प्रस्ताव ठेवले होते. आम्हाला आहे त्याच जागेवर नवीन इमारत बांधून द्या. दुसरा प्रस्ताव होता सरकारी जागेवर आम्हाला इमारत बांधून द्या आणि त्यांचा तिसरा प्रस्ताव होता, आम्हाला बाजार भावापेक्षा तीन पट अधिक किंमत देऊन हा परिसर तुम्ही ताब्यात घ्या. मात्र, एमएमआरडीए, महानगरपालिका अथवा राज्य सरकार या स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेत नाही. त्यामुळेच आता राज ठाकरे स्वतः अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहेत, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.

हेही वाचा - MLC Seat Vacant : विधानपरिषदेतील दहा आमदारांचा कार्यकाळ संपणार; कुणाची लागणार वर्णी?

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.