ETV Bharat / city

भांडुपमध्ये आधारभिंत कोसळली, जीवितहानी नाही - भांडूप भिंत कोसळली बातमी

मागच्या ४८ तासांमध्ये मुंबईला पावसाने झोडपून काढले. या तूफान बरसलेल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याबरोबरच झाडांची पडझड आणि घरात पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या. भांडुपमध्ये अनेक भागामध्ये संरक्षण भिंतींना तडे जात, त्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

wall collapsed in mumbai
भांडुपमध्ये आधारभिंत कोसळली
author img

By

Published : Jul 6, 2020, 7:24 AM IST

मुंबई - महानगरात सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे भांडुप पश्चिमेकडील प्रभाग ११३ मधील पवार चाळ व गावकर चाळ त्याचप्रमाणे गावदेवी मंदिराजवळील शामलाल चाळ परिसरात आधारभिंतीचा भाग कोसळल्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

wall collapsed in mumbai
भांडुपमध्ये आधारभिंत कोसळली

मागच्या ४८ तासांमध्ये मुंबईला पावसाने झोडपून काढले. या तूफान बरसलेल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याबरोबरच झाडांची पडझड आणि घरात पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या. भांडुपमध्ये अनेक भागामध्ये संरक्षण भिंतींना तडे जात, त्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

wall collapsed in mumbai
भांडुपमध्ये आधारभिंत कोसळली
भांडुप पश्चिमेच्या गावदेवी रोडवरील अनेक भागात सतत तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या असून, या घटनेत कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसली तरी, येथील राहिवाशांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. भांडुप हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असून, अनेक ठिकाणी डोंगराळ भागामध्ये लोक राहत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भांडुप विभागात संरक्षण भिंती आणि आधारभिंती बांधण्यात आल्या आहेत. परंतु, अलीकडच्या काळात या आधारभिंती जुन्या आणि जर्जर झाल्याने त्या कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांतून अनेकदा त्याची डागडुजी होते. परंतु, पुन्हा पाऊस आला की, नाल्याशेजारी असणाऱ्या आधारभिंतींना तडे जाऊन त्या कोसळतात त्यावर तात्काळ मदतकार्य पोहोचवले जात असल्याचे स्थानिक नगरसेविका दीपमाला बढे यांनी सांगितले.घटना घडल्यानंतर पालिका एस विभाग, अग्निशमन दल आणि आमदार रमेश कोरगावकर यांनी घटनास्थळी धाव घेत त्याची पाहणी केली असून, त्या कोसळलेल्या सगळ्या आधारभिंती आमदार निधीतून लवकरच पुन्हा दुरुस्त करणार असल्याचे यावेळी आमदार रमेश कोरगावकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.