मुंबई - राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी बाप्पाच्या आगमनावेळी ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला. तावडे यांच्या मलबार हिल येथील सेवा सदन या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणपतीचे आगमन झाले. यावेळी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती.
या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरण्याचा मोह विनोद तावडे यांना आवरला नाही. त्यांच्यासोबत अधिकारी व कार्यकर्तेही थिरकले.
यानंतर बाप्पाची पूजा झाली व मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही बाप्पाने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना विनोद तावडे यांनी केली.