ETV Bharat / city

vinayak mete death मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे विनायक मेटे कोण होते जाणून घ्या

शिवसंग्राम पक्षाचे नेते तथा माजी आमदार विनायक मेटे vinayak mete death यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आज सकाळी पुणे-मुंबई महामार्गावर मेटे यांच्या वाहनाचा who was vinayak mete अपघात झाला. त्यानंतर जखमी मेटे vinayak mete accident यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. विनायक मेटे यांच्याबद्दल जाणून घेऊया.

vinayak mete death and his profile
विनायक मेटे मृत्यू
author img

By

Published : Aug 14, 2022, 9:19 AM IST

Updated : Aug 14, 2022, 12:12 PM IST

मुंबई शिवसंग्राम पक्षाचे नेते तथा माजी आमदार विनायक मेटे vinayak mete death यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आज सकाळी पुणे-मुंबई महामार्गावर मेटे यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यानंतर जखमी मेटे who was vinayak mete यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता, त्याचे नेतृत्व केले होते. विनायक मेटे vinayak mete accident यांच्याबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा - Actor Armaan Kohli अभिनेता आरमान कोहलीची मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा जामिनासाठी धाव

विनायक मेटे हे बीड जिल्ह्यातील राजेगावचे रहिवासी होते. शिवसेना भाजप युतीत त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली होती. मेटे 3 जून 2016 साली बिनविरोध विधान परिषदेवर निवडून गेले होते. 2014 पर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते. 2014 विधानसभा निवडणुकीसाठी ते बीड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते, मात्र राष्ट्रवादीच्या जयदत्त शिरसागर यांनी त्यांच्या निवडणुकीत पराभव केला होता. माजी आमदार विनायक मेटे हे त्यांच्या आंदोलनामुळे ओळखले जातात. मराठा आरक्षण असो किंवा शिवस्मारक हे मुद्दे त्यांनी वेळोवेळी शासनापुढे उचलून धरले आहेत.

मराठा अरक्षणासाठी प्रयत्न विनायक मेटे यांनी वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्यावर्षी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टीकले नव्हते, तेव्हा मेटे यांनी ठाकरे सरकारचे हे मोठे अपयश म्हणत टीकेची झोड उठवली होती. त्यांनी 2 सप्टेंबर 2021 पासून राज्यवापी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. मराठा आरक्षणासाठी त्यांची तळमळ यातून दिसून येते.

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे हे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष होते. 2020 साली त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. 2021 साली कुलाब्यातील शिवस्मारकाच्या ऑफिसला गळती लागली होती. त्यावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच, शिवस्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करा. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. या कार्यालयाप्रमाणेच शिवस्मारकाचही काहीही झालेले नाही. उद्धव ठाकरे यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला होता.

हेही वाचा - विनायक मेटे यांच्या वाहनाचा मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात उपचारादरम्यान मृत्यू

Last Updated : Aug 14, 2022, 12:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.