मुंबई - पत्राचाळ प्रकरणात आता ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यादेखील अडचणीत सापडल्या आहेत. त्यांना ईडीने ( ED Summons Varsha Raut ) समन्स पाठवले आहे. पत्राचाळ प्रकरणात वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर त्यांना ईडीने हे समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यामुळे आता त्यांना ईडी समोर हजर राहून त्यांची बाजू मांडावी लागेल. वर्षा राऊत यांना 6 ऑगस्ट निर्देश रोजी समन्सद्वारे देण्यात आले आहेत.
वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून मोठा व्यव्हार - ईडीच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात वर्षा राऊत यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्यासंदर्भात भाष्य केले होते. ईडीने राऊत यांच्या घरावर छापे टाकले तेव्हा काही कागदपत्रे सापडली होती. त्यानंतर संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना रक्कम पाठवली गेली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आज ईडीने वर्षा राऊत यांना समन्स पाठवले आहे. शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांना आज कोर्टासमोर हजर ( Sanjay Raut case hearing ) केले असता पुन्हा 8 ऑगस्टपर्यंत ईडी कस्टडी ( Sanjay Raut Ed custody) देण्यात आली आहे. गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यामुळे आणखी संजय राऊत यांचा मुक्काम ईडी कोठडीत वाढला आहे.
11 लाख 50 हजार रुपये जप्त- खासदार संजय राऊत यांची चौकशीनंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेण्यात आले. या दरम्यान ईडीला या प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे मिळाली नाहीत अशी माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली आहे. त्यानंतर आता जी ताजी माहिती येते त्यानुसार खासदार संजय राऊत यांच्या घरातून 11 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळं या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
रविवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत घरी चौकशी- पत्राचाळ घोट्याप्रकरणी काल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत ( Sunil Raut on Sanjay Raut arrest by ED ) यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. रविवारी सकाळी 7 ते सध्याकाळी 4 पर्यंत संजय राऊत यांची त्यांच्या घरी चौकशी ( Sanjay Raut arrest by ED ) झाल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. तेथे चौकशी नंतर त्यांना ईडीने ( Patra chawl scam and sanjay raut ) अटक केल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली. भाजप संजय राऊत यांना घाबरत असून म्हणून त्यांची अटक करण्यात आल्याचे सुनील राऊत म्हणाले. तसेच, आज न्यायालयासमोर संजय राऊत यांना हजर करण्यात ( ED action on sanjay raut regarding patra chawl scam ) येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ईडी वतीने संजय राऊत यांना त्यांच्या घरीच नऊ तास सतत विचारपूस केली चौकशी केली. त्यानंतर मुंबईच्या येडी कार्यालयामध्ये संजय राऊत यांना पुढील चौकशीसाठी नेण्यात आले. या वेळेला शिवसेनेकांनी प्रचंड विरोधदेखील केला. त्याचवेळी संजय राऊत यांच्या घरातील सदस्य कासावीस झालेले दिसून आले.