ETV Bharat / city

राज्यात हाफकीनची लस एका महिन्यात उपलब्ध होणार - अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे

राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असून दिवसाला बारा ते पंधरा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे राजेंद्र शिंगणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे यासंबंधी रेमडेसिवीर तयार करणाऱ्या कंपन्यांशी राज्य सरकार चर्चा करत आहे. राज्य सरकारने कंपन्यांकडे असलेला माल राज्यात विकण्याची परवानगी दिली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा भरून निघेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
author img

By

Published : Apr 16, 2021, 5:59 PM IST

मुंबई - केंद्र सरकारकडून हाफकिन संस्थेला लस बनवण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ही लस बनवण्याचे काम एका महिन्यात सुरू करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. लस निर्मितीसाठी 150 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असून दिवसाला बारा ते पंधरा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे राजेंद्र शिंगणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे यासंबंधी रेमडेसिवीर तयार करणाऱ्या कंपन्यांशी राज्य सरकार चर्चा करत आहे. राज्य सरकारने कंपन्यांकडे असलेला माल राज्यात विकण्याची परवानगी दिली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा भरून निघेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्राला लस बनवण्याची परवानगी दिल्यामुळे पंतप्रधानांचे शिंगणे यांनी आभार मानले.

राज्यात ऑक्सिजनची कमतरता

सध्या राज्यात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच अनेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने राज्यामध्ये ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या राज्यात निर्माण होत असलेले ऑक्सिजन हे रुग्णांसाठी वापरण्यात येते आहे. मात्र तरीदेखील ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला हवाई मार्गाने ऑक्सिजन पुरवण्यात यावा, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्येचं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. तसेच राज्यात शक्य होईल तेवढ्या लवकर ऑक्सिजनचे नवीन प्लांट्स करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.