मुंबई - कोरोनापाठोपाठ महाराष्ट्राला म्युकर मायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचा देखील फटका बसला असून त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. म्युकर मायकोसिस या आजाराच्या राज्यात 1500 केसेस आहेत. त्यात 500 लोक बरे झाले असून इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राजेेश टोपे यांनी सांगितले, की महाराष्ट्रात आज 4,19,727 नव्या अॅक्टीव्ह असून राज्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर गेला आहे. सात लाखापर्यंत गेलेल्या केसेस आता 4 लाखापर्यंत खाली आल्या आहेत. डेली ग्रोथ रेट हा 0.5 टक्के आहे. महाराष्ट्र आता कोरोना बाबतीत 34 व्या क्रमांकावर आहे. राज्यात दोन कोटी 31 लाख लोकांना लसीकरण झाले आहे. लसीकरणासाठी आपले राज्य एक नंबरवर आहे. कोविशिल्डचे तीन लाख दुसरा डोस तर कोव्हॅक्सिनचे 2 लाख डोस उपलब्ध आहेत. हे सर्व डोस दुसऱ्या डोससाठी वापरणार आहोत.
राज्यात म्युकर मायकोसिसच्या १५०० केसेस -
आरोग्यमंत्री म्हणाले, की म्युकर मायकोसिस या आजाराच्या राज्यात 1500 केसेस आहेत. त्यात 500 लोक बरे झाले असून इतर लोकांवर उपचार सुरू आहेत म्युकर मायकोसिससाठी इन्फोटेरेन्सस बी इंजेक्शन लागतात
त्यासाठी केंद्र सरकारने 1 लाख 90 हजार इंजेक्शनच्या ऑर्डर दिल्या आहेत. संपूर्ण सप्लाय केंद्र सरकारकडे नियंत्रित आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सरकारला कोठा वाढवून दिला पाहिजे. यातही राज्यसरकार ग्लोबल टेंडर काढणार आहे. 1 लाख 10 हजार इंजेक्शनची आपण ऑर्डर दिल्या आहेत ते 31 मे नंतर मिळणार आहेत. या आजारावर उपचारासाठी 9 पानी डॉक्टरांना गाईड लाईन देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आजारांवर इलाज केला जातोय.
महात्मा जोतीराव फुले जनारोग्य योजनेंतर्गत यात उपचार केले जाणार आहेत. ज्या रुग्णालयात म्युकर मायकोसिसवर उपचार होत असतील त्याच ठिकाणी रुग्णांना घेतले जाणार आहे. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत दीड लाख रुपये उपचारासाठी मिळतात. त्यावर लागणार खर्च राज्य सरकारकडून केला जाणार आहे. यासाठी लागणारे औषध देखील मोफत देण्यात येईल. म्युकर मायकोसिससाठी एका पेशंटला अंदाजे 100 इंजेक्शन लागतात. त्यामुळे राज्याला 2 लाख इंजेक्शनची गरज आहे. उद्या पंतप्रधान 17 जिल्ह्याशी संबोधन करणार आहेत त्यात इंजेक्शनची मागणी करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
लसीसाठी राज्याकडून ग्लोबल टेंडर संदर्भात अटी सौम्य ठेवल्या आहेत, मात्र केंद्राची परवानगी लागणार आहे. अजून कोणत्याही कंपनीने रिस्पॉन्स दिलेला नाही. म्युकर मायकोसिसमुळे राज्यात आतापर्यंत 90 मृत्य झाले आहेत.