मुंबई - मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आल्याने शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण झालेले नाही, यामुळे पालकांच्या मनात भीती आहे. यावर १८ वर्षाखालील लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईचा प्लान तयार आहे. मुंबईत ३० लाख लहान मुले असून केंद्र शासनाकडून सविस्तर गाईडलाईन येताच २-३ दिवसांत त्यांचे लसीकरण सुरु करू, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी संगितले आहे.
केंद्र सरकारचे निर्देश येताच लहान मुलांचे लसीकरण -
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्याचवेळी १८ वर्षाखालील नागरिकांचे लसीकरण कधी केले जाणार असा प्रश्न सतत विचारला जात होता. लहान मुलांच्या शाळा सुरु झाल्याने त्यांना कोरोना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत प्रायोगित तत्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्यायेत त्यांच्यावर कोणतेही गंभीर रिअॅक्शन आढळलेल्या नाहीत. केंद्र सरकारने २ ते १८ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेनेही तयारी केली आहे. केंद्र सरकारचे निर्देश येताच लहान मुलांचे लसीकरण केले जाईल असे काकाणी यांनी सांगितले.
पालिकेची अशी आहे तयारी -
लहान मुलांचे लसीकरण प्रसुतीगृह आणि लहान मुलांची रुग्णालये, महापालिकेची ३५० लसीकरण केंद्रे याठिकाणी केले जाईल. लस देण्यासाठीची सिरींज, निडल कदाचित वेगळी असेल, निडलची साईज काय असेल याबाबत स्पष्टता नाही. याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर गाईडलाईन येणे गरजेचे आहे. पुरेसा लस साठा करण्यासाठी शीतगृह आहेत. मात्र, लहान मुलांसाठीच्या लसीकरता वेगळ्या तापमानाची आवश्यकता असेल का याबाबतही गाईडलाईन नंतर स्पष्टता येईल. १५०० व्यक्तींच्या स्टाफला लहान मुलांच्या लसिकरणासाठी ट्रेनींग देण्यात येईल. खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर्सनाही ट्रेनींग देणार आहोत. लहान मुलांच्या लसिकरणानंतर काही रिअॅक्शन्स आल्या तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्ड उभारण्यात आले आहेत त्याचा वापर करता येऊ शकेल. लहान मुलांच्या लसिकरणा करताही महापालिका जनजागृती मोहिम हातात घेईल असे काकाणी यांनी सांगितले.
नियमावली जारी करणार -
लवकरच केंद्र सरकार लहान मुलांच्या लसीकरणासंबंधित नियमावली जारी करणार आहे. काही महिन्यांपूर्वीच लहान मुलांवर कोवॅक्सीन (Covaxin) ची तपासणी केली जात होती. आतापर्यंत लशीची यशस्वीपणे चाचणीही झाली असल्याचे सूत्रांकडून समजते. लवकरच लसीकरणाची प्रक्रिया, त्याची प्राथमिकता, दोन डोसमधील अंतर याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल.
डेटा CDSCO ला सादर -
भारत बायोटेकने COVAXIN (BBV152) साठी 2-18 वर्षे वयोगटातील मुलांच्या क्लिनिकल चाचण्यांमधून संकलित केलेला डेटा CDSCO ला सादर केला आहे. सीडीएससीओ आणि विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) डेटाची चाचपणी केली आहे. त्यानंतर सकारात्मक शिफारसी दिल्या आहेत. विषय तज्ञ समितीने (एसईसी) डीसीजीआय (ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) ला 2-18 वर्षांच्या मुलांसाठी भारत बायोटेकच्या COVAXIN (BBV152) वापरासाठी शिफारस दिल्याचे सूत्रांकडून समजते.
हेही वाचा - Corona Update : राज्यात 2384 नवे रुग्ण, 35 रुग्णांचा मृत्यू