मुंबई - मुंबईमध्ये गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना म्हणजे जे लोक घराबाहेर पडू शकत नाहीत. अशा लोकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्यांदा के पूर्व विभागात आजपासून (दि.30 जुलै) रोजी लसीकरण सुरू झाले आहे.
अंधेरीतील विजय नगरमध्ये वृद्ध महिलेला दिली लस
आपल्या आजारपणासह शारीरिक / वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची कार्यवाही के/पूर्व प्रभागापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आले आहे.अंथरुणास खिळून असणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करायचे असल्यास त्यांची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvaccsbedridden@gmail.com या ईमेल आयडीवर मागविण्यात आली आहे.