मुंबई - मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज मंगळवारी मुंबईत 50 हजार 594 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 14 लाख 61 हजार 922 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत मंगळवारी 50 हजार 594 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 47 हजार 171 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 423 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 14 लाख 61 हजार 922 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 12 लाख 94 हजार 261 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 67 हजार 661 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 54 हजार 445 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 67 हजार 889 फ्रंटलाईन वर्कर, 6 लाख 20 हजार 734 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 3 लाख 18 हजार 854 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा - कोविड नियमांचे पालन करून रविवारीच होणार 'एमपीएससी'
असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 30 हजार 483 तर आतापर्यंत 9 लाख 48 हजार 348 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 3 हजार 979 लाभार्थ्यांना तर एकूण 88 हजार 066 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 16 हजार 132 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 4 लाख 25 हजार 508 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2,54,445
फ्रंटलाईन वर्कर - 2,67,889
जेष्ठ नागरिक - 6,20,734
45 ते 59 वय - 3,18,854
एकूण - 14,61,922
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार्सल स्वरूपात मिळणार शिवभोजन थाळी