ETV Bharat / city

Vaccination for 15-18 Age : मुंबईत पहिल्याच दिवशी 6115 मुलांचे लसीकरण; वाचा मार्गदर्शक सूचना - 3 जानेवारी मुंबईत लहान मुलांचे लसीकरण

देशभरात कोरोना (Corona) आणि ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांची संख्या वाढत आहे. लसीकरणाचा एक टप्पा म्हणून सोमवारपासून 15 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी मुंबईतील 9 लसीकरण केंद्रावर 6115 लहान मुलांना लस देण्यात आली.

Vaccination
लहान मुलांचे लसीकरण
author img

By

Published : Jan 4, 2022, 1:08 AM IST

मुंबई - देशभरात कोरोना (Corona) आणि ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना तसेच ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी गेले वर्षभर लसीकरण मोहीम सुरू (Vaccination) आहे. या लसीकरणाचा एक टप्पा म्हणून सोमवारपासून 15 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी मुंबईतील 9 लसीकरण केंद्रावर 6115 लहान मुलांना लस देण्यात आली.

6115 मुलांना लस -+

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. 18 वर्षावरील नागरिकांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जात आहे. आज (3 जानेवारी)पासून 15 ते 17 वयोगटातील 9 लाख लहान मुलांना लस देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ पर्यावरण व मुंबई उपनगरचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. आज पहिल्याच दिवशी मुंबईमधील 9 कोविड केंद्रांवर 6115 मुलांना लस देण्यात आली. यामध्ये पालिकेच्या केंद्रांवर 4806, राज्य व केंद्र सरकारच्या केंद्रांवर 148 तर खासगी केंद्रांवर 1161 मुलांना लस देण्यात आली.

भायखळा जम्बो सेंटरमध्ये 432 मुलांना लस -

भायखळा (इ विभाग) येथील रीचर्डसन क्रूडास जम्बो कोविड सेंटरमध्ये, 15 ते 17 वर्षे वयोगटातील कोविड लसीकरण अंतर्गत आज पहिल्या दिवशी एकूण 432 मुलांनी लस घेतली. यामध्ये महानगरपालिका शाळेतील 67 विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या कोविड केंद्रात, 15 ते 17 वर्षे वयोगटासाठी कोविड लसीकरण शुभारंभ प्रसंगी स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार यामिनी यशवंत जाधव, प्रभाग समितीचे अध्यक्ष रमाकांत रहाटे, स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर, सुरेखा लोखंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नाव नोंदवून लसीकरणाला या -

मुंबईत कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वाढला आहे. हा प्रसार लहान मुलांना होऊ नये म्हणून आजपासून देशभरात 15 ते 17 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार पालिकेने मुंबईमधील 9 केंद्रांवर आजपासून लसीकरण सुरू केले जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लहान मुलांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून पालकांनी आपल्या मुलांचे नाव कोविन ऍपवर नोंद करूनच लसीकरण केंद्रावर जावे असे आवाहन महापौरांनी केले आहे. 15 ते 17 वयोगटातील सर्व लहान मुलांना लसीचे डोस देऊन कोरोना आणि ओमायक्रॉनवर मात करण्यास सहकार्य करावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक सूचना -

- सन 2007 वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी हे पात्र राहतील.
- आज पासून लाभार्थ्यांना कोविन ऍपवर मोबाइल नंबर नोंदणी सुरु.
- लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करून लसीकरण करण्याचीही सुविधा
- 15 ते 17 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी केंद्रावर फक्त कोवॅक्सिन लसच उपलब्ध असेल याबाबत खबरदारी घ्यावी.
- ज्या ठिकणी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करणे शक्य नसेल अशा ठिकाणी स्वतंत्र रांगा असाव्यात.

या ठिकाणी होणार लसीकरण -

- भायखळा आर.सी. कोविड लसीकरण केंद्र
- सायन सोमय्या जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- वरळी एनएससीआय डोम, जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- बांद्रा बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र एच / प
- गोरेगाव नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- मालाड जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- दहिसर जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- कांजूरमार्ग क्रॉम्प्टन अँड ग्रीव्ह्स जम्बो लसीकरण केंद्र
- मुलुंड आर सी जम्बो कोविड लसीकरण केंद्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.