ETV Bharat / city

मुंबईत दिव्यांग मुलांसाठी लसीकरण मोहीम.. १३० लाभार्थ्यांना लस

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण देखील देशात युद्ध पातळीवर राबवले जात आहे. मात्र असे असले तरी लशींच्या तुटवड्याची समस्या दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती मंदावाली आहे. मात्र समाजातील प्रत्येक घटकाचे लसीकरण केले जाणार असल्याची ग्वाही प्रशासनाकडून दिली जात आहे. एडवेंचर्स बियोन्ड बैरियर्स फाउंडेशन या संस्थेमार्फत दिव्यांगासाठी लसीकरणाचे ड्रायईव्ह आज मुंबईच्या रहेजा रुग्णालयात केले होते.

Vaccination campaign for disabled children

author img

By

Published : May 30, 2021, 7:20 PM IST

Updated : May 30, 2021, 7:38 PM IST

मुंबई - कोरोनाच्या काळात सर्वच यंत्रणांवर ताण आला आहे. आरोग्य यंत्रणेवर सर्वाधिक ताण आला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाटेने कहर केला असून राज्यात कोरोनामुळे प्रशासनाने लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण देखील देशात युद्ध पातळीवर राबवले जात आहे. मात्र असे असले तरी लशींच्या तुटवड्याची समस्या दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती मंदावाली आहे. मात्र समाजातील प्रत्येक घटकाचे लसीकरण केले जाणार असल्याची ग्वाही प्रशासनाकडून दिली जात आहे. एडवेंचर्स बियोन्ड बैरियर्स फाउंडेशन या संस्थेमार्फत दिव्यांगासाठी लसीकरणाचे ड्रायईव्ह आज मुंबईच्या रहेजा रुग्णालयात केले गेले.

मुंबईत दिव्यांग मुलांसाठी लसीकरण मोहीम

130 लाभार्थ्यांचे लसीकरण -

एडवेंचर्स बियोन्ड बैरियर्स फाउंडेशनने या आगोदर देखील लसीकरणाचे ड्राईव्ह केले होते. मात्र लस उपलब्ध नसल्याने याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे संस्थेचे संस्थापक दिव्यांशू गणात्र सांगतात. या कोरोनाच्या काळात अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दिव्यांगामुळं अगोदरच प्रतिकार शक्ती कमी असते त्यामुळे कोरोनाचा धोका संभावत होता. त्यात लस उपलब्ध होत नसल्यामुळे समस्या निर्माण होत होती. मात्र आज 130 जणांचे लसीकरण झाले आहे. एका आठवड्यात तब्बल 4 हजार दिव्यांग लाभार्थ्यांनी लसीसाठी नोंदणी केल्याचे दिव्यांशू गणात्र सांगतात. तसेच 20 हजार दिव्यांग लाभार्थ्यांना लस देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे देखील संस्थापकांकडून सांगण्यात आलंय. यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे देखील सांगतात.

एक वर्ष घरात राहणे कठीण -

एडवेंचर्स बियोन्ड बैरियर्स फाउंडेशननं रहेजा रुग्णालयात दिव्यांगासाठी लसीकरण मोहिम राबवली होती. लसीकरण हे खूप महत्त्वाचं यासाठी आहे की, या लसीकरणामुळे कोरोना दूर राहिल. या लसीकरणासाठी अनेक जण आले होते यामध्ये निकी रामनानी यांच्यासोबत आम्ही बातचीत केली. त्यावेळी त्यांनी सरकारविषयी नाराजी स्पष्ट बोलून दाखवली. सरकारकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा राहिली नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच ज्या संस्थेकडून लसीकरण मोहिम राबवली गेलीय त्यांचे आभार देखील त्यांनी मागनले. तसेच या एका वर्षाच्या काळात दिव्यांग मुल घरात राहणे हा काळ त्या मुलांसाठी खूप कठीण असतो. मात्र ही मुलं घराच्या बाहेर आली आहेत, त्यामुळं मुलं आनंदी आहेत, असं रामनानी म्हणाले.

Last Updated : May 30, 2021, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.