मुंबई - लोकशाहीत लोकांचा निर्णय हा अंतिम असतो. या मतमोजणीत घोळ झाला आहे. त्याबाबतचा अहवाल तयार करून तो निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल. तसेच जे पण सत्य आहे, ती हार विनम्रपणे स्वीकारली असल्याचे काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे.
गोरेगावच्या नेस्को येथील मतमोजणी केंद्राला भेट दिल्यावर उर्मिला यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज उत्तर मुंबईतील मतमोजणीचा जो निकाल त्याबाबत कारण देत रडत बसणार नसल्याचे देखील उर्मिलाने म्हटले.