मुंबई - घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार पराग शहा यांच्या प्रचार सभेकरता केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी शुक्रवारी टिळक नाका येथे सभेला संबोधित केले. या परिसरात मोठ्या संख्येने गुजराती मतदार असल्याने त्यांनी गुजराथीत भाषण केले. यानंतर माध्यमांसोबत बोलताना रुपाला यांनी, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत युवकाचा व महिलांचा उत्साह पाहून, विरोधी पक्षातील उमेदवारांना जेवढे मत मिळणार आहेत. त्याच्या कितीतरी पटीने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्य मिळणार आहे, असे म्हटले.
पराग शहा यांचा विजय मोठ्या मताधिक्याने
घाटकोपर पूर्व विधानसभेच्या निवडणुकीत महिला व युवकांचा उत्साह पाहून जितकी मते विरोधी पक्षातील उमेदवारांना मिळणार आहेत त्याच्या कितीतरी पटीने मते भाजपचे उमेदवार पराग शहा याना मिळणार आहेत. तसेच घाटकोपर पूर्व विधानसभेत पराग शहा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री पुरषोत्तम रुपाला यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा... उद्धव ठाकरे, पंतप्रधान मोदींची मुंबईत आज संयुक्त सभा
रुपाला यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
लोकांच्या आवडीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणीस यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात या विधानसभा निवडणुकीत एक विजयी इतिहास बनणार आहे, असे रूपाला यावेळी म्हणाले
हेही वाचा... सावरकरांना भारतरत्न देण्याच्याआधी त्यांच्या पुतळ्याजवळचा रस्ता नीट करा - कन्हैया कुमार
प्रकाश मेहता भाजपचे सच्चे कार्यकर्ता
माजी मंत्री प्रकाश मेहता यांच्या निवडणूक सभेकरता बरेच वेळा घाटकोपरमध्ये आपण आला आहात. मात्र, माजी मंत्री प्रकाश मेहता हे पराग शहाच्या आणि पक्षांच्या कोणत्याही प्रचार रॅलीत व प्रचार सभेत दिसत नसल्याने त्यांची नाराजी खरोखरच पक्षाला नुकसानकारक होईल का ? असा प्रश्न विचारल्यानंतर रूपाला यांनी, प्रकाश मेहता हे पक्षाचे एक सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते जिथे कुठे असतील तेथे पक्षाचे आपल्या परीने काम करत असतील, असे म्हटले.