ETV Bharat / city

Sanjay Raut : 'पवार-ठाकरेंच्या पुढाकाराने भाजपाविरोधी पक्षांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न' - संजय राऊत शरद पवार मराठी बातमी

भाजपाविरोधात देशातील विरोधी पक्ष एकत्र येणार ( Non Bjp Chief Minister Meeting ) हेत. स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Ncp Leader Sharad Pawar ) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) हे या बैठकीसाठी पुढाकार घेतील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut
author img

By

Published : Apr 17, 2022, 4:50 PM IST

Updated : Apr 17, 2022, 6:39 PM IST

मुंबई - एकीकडे देशात महागाईपासून ते बेरोजगारांपर्यंत आणि दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी वाढल्या आहेत. या सर्वांना लगाम घालण्यासाठी भाजपाविरोधात देशातील विरोधी पक्ष एकत्र येणार ( Non Bjp Chief Minister Meeting ) आहेत. स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Ncp Leader Sharad Pawar ) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) हे या बैठकीसाठी पुढाकार घेतील. मुंबईत त्याचे नियोजन सुरु झाले असून, लवकरच बैठक होईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपाविरोधात देशातील विरोधक एकवटणार - संजय राऊत म्हणाले की, देशात भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वाढतो आहे. दुसरीकडे महागाई, बेरोजगारी, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात मोट बांधणी करावी लागेल, अशी इच्छा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( CM Mamata Banerjee ) व्यक्त केली होती. देशातील सर्व विरोधकांना बोलवावे, अशी विनंती केली. त्यानुसार मुंबईत बैठक घेण्याचे निश्चित झाले असून, तयारीला सुरुवात झाल्याचे संजय राऊत यांनी ( Non Bjp Cm Meeting In Mumbai ) सांगितले.

राज ठाकरेंवर टीका - महाराष्ट्र शांत असून, काही लोकांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पोलिसांनी सर्व परिस्थिती हाताळली. कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. राम आणि हनुमानाच्या नावाने दंगल घडवण्याचा त्यांचा हेतू होता. नवे हिंदू ओवैसी तयार होत आहेत. पंतप्रधानांनी जातीय तणाव निवळण्यासाठी आवाहन करायला हवे, अशी मागणी राऊत यांनी केली. पंतप्रधानांचे या वातावरणाला समर्थन आहे का?, असा सवालही त्यांनी केला ( Sanjay Raut On Raj Thackeray ) आहे.

संजय राऊत प्रसारमध्यमांशी संवाद साधताना

हिंदू-मुस्लिम दंगलीचे प्रयत्न - दिल्लीतील हिंसेवरून राजकीय फायद्यासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी देशातील वातावरण खराब केले जात आहे. देशासाठी हे योग्य नाही. दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला झाला. यापूर्वी आजपर्यंत असे कधीच झाले नव्हते. शांततेत उत्सव साजरे केले जात होते. मिरवणूक काढण्याचा हक्क सर्वांना आहे. कालचे हल्ले नियोजित होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंदू मुस्लिम दंगे व्हावेत, यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहे. भारत-पाक चालणार नाही, अयोध्या चालणार नाही, सर्जिकल स्ट्राईक चालणार नाही, त्यामुळेच हा प्रकार सुरू आहे, असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या कारभारावर चौफेर हल्ला संजय राऊतांनी चढवला ( Sanjay Raut Allegation Central Government ) आहे.

जेम्स लेनवर बोलण्यास नकार - मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही. जेम्स लेनने काय लिहिले ते माहीत नाही. मी त्यावर बोलणार नाही. पुरंदरे हे त्यांच्या वतीने खुलासा करण्यासाठी जिवित नाही. बाजू मांडण्यासाठी जिवित नाहीत, त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणं योग्य नाही, असे म्हणत जेम्स लेन प्रकरणावर बोलण्यास संजय राऊतांनी नकार दिला ( Sanjay Raut On James Lane ) आहे.

हेही वाचा - Shivsena Agitation At Navneet Rana House: नवनीत राणांच्या घरासमोर शिवसेनेचे आंदोलन, शिवसैनिकांना पोलिसांना घेतले ताब्यात

Last Updated : Apr 17, 2022, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.