ETV Bharat / city

इंधन दरवाढीवरून मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारला टोला, म्हणाले... - etvbharat Marathi

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की एमएमआरडीएच्या कामांना अधिक गती देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार आहे. शहरांचा विकास करताना आपण चटई क्षेत्र निर्देशांक वाढवून देतो. पण रस्ते एकदा बांधले की बांधले, आपण त्यासाठी काही करीत नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Oct 28, 2021, 3:13 PM IST

मुंबई - देशाला महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. इंधनाचे दर ही प्रतिदिन वाढत असल्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार फटकेबाजी केली. सार्वजनिक वाहतूकीचा टक्का घसरत असल्याने पेट्रोल, डिझेलची दरवाढ केली जात आहे. ती भल्यासाठी असल्याचा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला आहे. एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवाल आणि कार्यशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की एमएमआरडीएच्या कामांना अधिक गती देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार आहे. शहरांचा विकास करताना आपण चटई क्षेत्र निर्देशांक वाढवून देतो. पण रस्ते एकदा बांधले की बांधले, आपण त्यासाठी काही करीत नाही. कुणालाही गर्दीत आपली गाडी चालविण्याची हौस नाही. वाहतूक व्यवस्था ही शरीरातल्या रक्तवाहिन्यांसारखी आहे. रस्ते पूर्णपणे खड्डे मुक्त, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीटनेटकी व कार्यक्षम तसेच वेगवान असणे याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. कोरोना काळात बस, रेल्वेमधील प्रवासी संख्या परत वाढत चालली आहे.

हेही वाचा-Kiran Gosavi Arrest : किरण गोसावीला पुणे पोलिसांनी केली अटक; दुपारी न्यायालयात करणार हजर

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, सुविधा वाढवतांना पर्यावरणाला मारू नका. आपण खरोखरच किती आणि कसा नियोजनबद्ध विकास केला हे पाहायला पाहिजे. जिथे असा विकास झालेला नाही, तिथेही आपल्याला कर्तव्य म्हणून पाणी, रस्ते, ड्रेनेज अशा सुविधा द्याव्यात लागतात. आता मुंबईती मेट्रो स्थानके पहिली म्हणजे आपण मुंबईत आहोत की दुसऱ्या देशात, असे वाटते. कुठल्याही त्रास आणि अडथळ्याशिवाय प्रवास करण्याचे स्वप्न एमएमआरडीएच्या या नव्या अभ्यासातून पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा-मुंबई पोलीस करणार समीर वानखेडेंची चौकशी; चार तपास अधिकाऱ्यांचे नावे जाहीर

नागरी सुविधांवर लक्ष द्यावे - एकनाथ शिंदे

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की आपले रस्ते आपली खरी श्रीमंती दाखवतात. मुंबई आणि मुंबई महानगरच नव्हे तर राज्यात सर्वत्र उत्तम रस्ते असणे यावर प्राधान्य देण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी रस्ते खराब होऊ नयेत म्हणून ते काँक्रीटमध्ये बांधण्याचा निर्णय झाला आहे. एमएमआरडी कडून लोकांच्या अपेक्षा वाढत आहे. महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्तांनीदेखील नागरी सुविधा नागरिकांना व्यवस्थित मिळतील हे पाहणे गरजेचे आहे. सर्व करताना पर्यावरणाचा समतोल ढळू न देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असेही नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले.

हेही वाचा-'रोज सकाळी आमच्या अब्रुची लक्तरं काढली जातेय'; क्रांती रेडकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ताळमेळ व शिस्त हवी - आदित्य ठाकरे

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की झोपडपट्टी पुनर्विकास, उपकरप्राप्त इमारतींची पुनर्रचना, म्हाडामार्फत गृहनिर्माण अशा वेगवेगळ्या संस्थांकडून शहरांमध्ये नवीन वसाहती निर्माण केल्या जात आहेत. साहजिकच लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्याला केवळ नवनवीन रस्त्यांचे नियोजन नव्हे तर उत्तम पर्यायी व जोड रस्ते यांचेही नियोजन करावे लागणार आहे. मुंबईत आज 3500 बस आहेत. पण 10, 000 बस धावू लागतील तेव्हा वाढीव लोकसंख्येचा विचार करून आपण सर्वांना ही सुविधा देण्याचे समाधान मिळेल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. याव्यतिरिक्त आपण इलेक्ट्रिक किंवा आणखी कोणते पर्यावरणपूरक इंधन वापरतो, हादेखील कळीचा मुद्दा ठरतो आहे. ही सर्व व्यवस्था शाश्वत असली पाहिजे आणि यात चांगला ताळमेळ व शिस्त हवी तरच ती परिणामकारक ठरेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास व इतर अधिकारी उपस्थित होते.

असे वाढले आहेत देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

देशातील बहुतांश शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 100 रुपयांहून अधिक आहे. 28 सप्टेंबरपासून पेट्रोलचे दर हे 22 वेळा वाढविण्यात आले आहे. या दरवाढीने पेट्रोलची किंमत 6.75 रुपयांनी वाढली आहे. तर डिझेलचे दर हे 24 सप्टेंबरपासून 24 वेळा वाढविले आहेत. या दरवाढीमुळे डिझेल हे 8.05 रुपयांनी वाढले आहे. त्यापूर्वी 4 मे ते 17 जुलै दरम्यान पेट्रोलचे दर हे 11.44 रुपयांनी वाढले आहेत. तर याच कालावधीत डिझेलचे दर हे प्रति लिटर 9.14 रुपयांनी वाढले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.