मुंबई महाराष्ट्रात येणारे उद्योग निघून जात आहे. तरीही होय राजा हे म्हणून गप्प बसत ( Shinde group Vs Uddhav Thackeray group ) आहेत. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा असे करत आहेत, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व भाजपवर केला. शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करताना, शिवसेनेचा दसरा मेळावा हा आपल्या परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार आणि शिवतीर्थावरच घेणार आहे, अशा शब्दांत ठणकावले. राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी आज पहिल्यांदाच गोरेगावमधील नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांच्या मेळावा ( Uddhav Thackeray slammed Amit Shah ) घेतला. बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटा आणि भाजपवर टीकेचे तोफ ( Uddhav Thackeray speech ) डागली.
सध्या बाप पळवणारी औलाद आली- पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे ऐवढी गर्दी जमली आहे. तर दसऱ्याला किती गर्दी असेल. किती पटीत असेल, आणि दसरा मेळावा हा आपल्या परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार आणि शिवतीर्थावरच घेणार असे ठणकावून सांगितले. तसेच व्यासपीठावर आल्यावर मी एक-दोन गोष्टी बघितल्यात एक तर पहिली रिकामी खुर्ची पाहिली. संजय राऊत एक खुलासा करून टाकतो, नाही तर उद्या चौकट यांची की, संजय राऊत शिंदे गटामध्ये गेले. नाही मिंदे सगळे तिकडे गेलेले आहेत. पण संजय राऊत म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. या निश्चयाने लढतायत, आणि या लढाईसोबत आहेत. तलवार हाता घेऊन आघाडीवर आहेत. मुले पळवणारी टोळी ऐकली आहे. पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरत आहे. मला आश्चर्य वाटते की ऐवढी वर्ष तुम्ही आम्ही सगळ्यांच यांना सत्तेचे दुध पाजले. आणि आता तोंडाची गटारे उघडली आहेत. जाऊ देत मला त्यांच्यावर बोलण्याची काही गरज नाही. तुम्ही सगळे त्यांना उत्तर देत आहात, असे सांगत शिवसैनिकांचे मनोबल वाढविले.
शिवसैनिक तलवारीची पाती विशेष म्हणजे मुंबईचे लचके तोडणारी गिधाडे फिरायला लागली आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत वाचत मोठे झाले आहोत. सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करताना अनेक शाह स्वराज्यावर चालून आले होते. मध्ये येऊन गेले त्या कुळातील आताचे शाह म्हणजे आताचे देशाचे गृहमंत्री ते म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवा असे म्हणाले. इकडं असलेली गवताची पाती नाहीत तलवारीची पाती आहेत. गिधाडं हा शब्द जाणीवपूर्वक वापरला. मुंबईची निवडणूक आल्यानंतर तुम्ही येता, मुंबईवर संकट आल्यानंतर तुम्ही कुठं असता?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच मुंबादेवी, ती आमची आई आहे. आईला गिळणारी औलाद सुद्धा आहे. या शिवसेनेने तुम्हाला मोठे केले. तुम्हाला पद दिली. येताना रस्त्यावर पाहत होतो सुरत २३२ कि.मी. किती लांब जावे लागले ढोकळा खायला, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांवर हल्लाबोल केला.
कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? मुंबईवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपचा कमळाबाई असा शब्दप्रयोग केला. कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांचा आहे. ही तिच शिवसेना आहे, हे पाहिल्यानंतर पुन्हा मुंबईवर दावा करु नका. वंशवादावरुन आमच्या घराण्यावर टीका होते. या मुंबईवर वाकडी नजर पडली आहे त्यावेळच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत जनसंघ नव्हता. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती त्याच्या पहिल्या पाच अग्रणी होते त्यात माझे आजोबा होते. मेलो तरी बेहत्तर मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे अशी स्थिती असताना निवडणुकीच्या वेळी जागा वाटपाचे नाटक करुन जनसंघ समिती फोडून बाहेर पडला. जनसंघ त्यातून बाहेर पडला. पण आपण दुर्देवाने त्यांच्याबरोबर युती केली. मी पुन्हा बोललो होतो, आपली २५ वर्ष युतीत सडली, असे सांगत उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजप सोबत सडल्याचे पुनरुच्चार केला. मी जाणून बुजून कमळाबाई बोललो कमलाबाई हा शब्द बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे. वंशवादावरून आमच्यावर टीका सुरू आहे, मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे संयुक्त महाराष्ट्राच्या समितीमध्ये माझे आजोबा शेलार मामा होते, आताचे शेलार नव्हे (आशिष शेलार यांना चिमटा) असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
सगळी नालायक माणसं आपण जोपासली- सगळी नालायक माणसं आपण जोपासली, असा त्यांनी बंडखोर शिंदे गटाला टोला लगाविला आहे. तुमच्या वंश कोणता उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल केला. चित्ते आणल्यावरून ही उद्धव उद्धव ठाकरे आणि भाजपला फटकारले. दार उघडल्यावर चित्ता करतो म्याऊ म्याऊ असा टोला लगावला. शिवसेनेचा सर्वोच्च न्यायालयातील निकाल हा फक्त शिवसेनेचा नाही. तर देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही हा निकाल असणार आहे. कायद्यासमोर सगळे आहेत, हे आम्हाला कळू द्या. लोकशाही खरी आहे, हे कळू द्या. हे खोके सरकार पहिल्यांदा बाहेर या, मग बाहेर या.
हिंदूमध्ये फूट करणे शक्य नाही मुस्लिम लोकदेखील शिवसेनेसोबत आहेत. हिंदूमध्ये मराठी व अमराठी भेदभाव करा, ते शिवसेनेसोबत आहेत. कोरोनाच्या काळात कोणताही भेदभाव केला नाही. १९९३ च्या काळातही शिवसेनेने दर्ग्याचे रक्षण केले. बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील देशातील सर्वात मुसलमान गद्दार आहेत, असे कधी म्हटले नाही. दसऱ्यावर शाहनीतीवर बोलणार नाही. हिंदू मुसलमान अशी मराठीत फूट पडणे शक्य नाही. तुमचे चेल चपाटे असेल तर मुंबई महापालिका घेऊन दाखवा. त्याचवेळी विधानसभा निवडणूक घेऊन दाखवा. कुस्ती आम्हाला येते, बघू कोण पाठीला माती लावते. शिवसेनेचे नगरसेवक जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. जा, आता निघू जा. शिवसेनेच्या आमदारांना हेच सांगितले होते. ज्यांनी इमान विकले आहे, ते किती वेळ ईमानदारीचा बुरखा घालणार आहेत? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुखांनी केला.