मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसी मैदानावर शनिवारी जाहीर सभा झाली. सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, राणा दाम्पत्य यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसे यांना खडे बोल ( Uddhav Thackeray Criticized Opposition ) सुनावले. शिवाय किरीट सोमय्या यांनाही फैलावर ( Opposition Aggresive Against CM Thackeray Statement ) घेतले. त्यावर फडणवीस, सोमय्या आणि राणा यांनी या टीकेला प्रत्त्युत्तर ( Fadnavis Somaiya Rana Replied CM Thackeray ) दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले : 'सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम.. अरे छट हा तर निघाला.. आणखी एक टोमणे बॉम्ब.. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा!', अशा शब्दात फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विट करत इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बाटलेले - सोमय्या : बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व असली होत, उद्धव ठाकरे यांचे नकली असून, बाटलेले हिंदुत्व आहे, अशी खरमरीत टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केली. तसेच उद्धव ठाकरे डरपोक असल्याचेही सोमय्या म्हणाले. संजय राऊत यांचा बोलविता धनी उद्धव ठाकरे आहेत. त्यांचे अनेक मंत्री कोर्टात चकरा मारत आहेत. काही जेलमध्ये आहेत, तर काही रुग्णालयात आहेत असा चिमटा सोमय्या यांनी काढला. उद्धव ठाकरे यांना न्यायालयाने उत्तर दिले आहे. काल त्यांच्या चेहऱ्यावर ती ते स्पष्टपणे दिसत होते. तुमच्यात हिंमत असेल तर स्पष्ट करा की, ते 19 बंगले कोणाचे आहेत, असे आव्हान देखील सोमय्यांनी उद्धव ठाकरेना केले. तसेच उद्धव ठाकरे डरपोक असून, महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचे काम करत आहेत. तसेच तेजस ठाकरे यांनीही मनी लोडिंग केल्याचा आरोप सोमय्यांनी केला. रश्मी ठाकरेबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही, मात्र मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्यावर जोरदार टीका केली.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या : उद्धव ठाकरेंनी सत्तेचा दुरुपयोग केला आहे. हनुमान चालिसासाठी आम्हाला आत टाकलं. महिलांना तुरुंगात टाकणारं हे सरकार आहे. माझ्यावर जो अन्याय केला. हनुमान चालिसापासून ते तुरुंगापर्यंत मला त्रास दिला गेला. आजही त्रास होत आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार नाहीत. ज्या दिवशी तुमची सत्ता जाईल आणि रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकलं तर त्या दिवशी त्यांना विचारेन आता कसं वाटतंय. वेदना काय असते. तुरुंग काय असतो आणि तुरुंगातील एक एक मिनिट किती वेदनादायी असतो, हे मी मुख्यमंत्र्यांना विचारेल. काही ही गुन्हा न करता तुरुंगात टाकल्यावर त्याची वेदना काय असते हे तेव्हाच तुम्हाला कळेल. हा दिवस एक दिवस येणारचय तुमची सत्ता गेल्यावर तुमच्या घरातील महिला तुरुंगात गेल्यावर तुम्हाला मी हा सवाल करणारच.